‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ चित्रपटाची स्क्रिनिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST
‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ चित्रपटाची स्क्रिनिंग अलीकडेच जुहू येथे पार पडली. तिथे वरूण धवनने त्याच्या डॅशिंग अवतारात एन्ट्री घेतली.
‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ चित्रपटाची स्क्रिनिंग
‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ चित्रपटाची स्क्रिनिंग अलीकडेच जुहू येथे पार पडली. तिथे वरूण धवनने त्याच्या डॅशिंग अवतारात एन्ट्री घेतली.बॉलिवूडचा चॉकलेट बॉय वरूण धवन याने कॅज्युअल ड्रेसिंगमुळे उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अभिनेत्री आलिया भट्ट ही देखील तिच्या कुटुंबियांसोबत स्क्रिनिंगला आली होती. आलिया भट्ट हिचा हटके अंदाज नेहमीच लक्ष वेधून घेत असतो. तिचा हा कॅज्युअल लुक सर्वांना आकर्षित करत होता. स्क्रिनिंगवेळी दिग्दर्शक करण जोहर यानेही उपस्थिती नोंदवली. सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे तो चर्चेत आहे. अभिनेता अली फजल चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी याठिकाणी उपस्थित राहिला होता. फोटोग्राफर्सना त्याने अशी कुल पोझ दिली.