Join us

‘या’ चित्रपटातून डेब्यू करणार बाबा रामदेव; ‘या’ अभिनेत्रींच्या असतील प्रमुख भूमिका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 19:56 IST

योग गुरू बाबा रामदेव लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहेत. आतापर्यंत अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये बघावयास मिळालेले बाबा रामदेव लवकरच ‘ये ...

योग गुरू बाबा रामदेव लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहेत. आतापर्यंत अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये बघावयास मिळालेले बाबा रामदेव लवकरच ‘ये हैं इंडिया’ या चित्रपटातील एका गाण्यात बघावयास मिळणार आहेत. हा त्यांचा बॉलिवूड डेब्यू असेल. खरं तर बाबा रामदेव यांनी बºयाचशा सेलिब्रिटींबरोबर स्टेज शो केले आहेत. आता बॉलिवूडमध्येही ते झळकणार असल्याने चाहते त्यांना मोठ्या पडद्यावर बघण्यास उत्सुक आहेत. दरम्यान, ‘ये हैं इंडिया’ या चित्रपटाचे दिग्दर्शन लोम हर्ष यांनी केले आहे. चित्रपटात गेवी चाहल आणि डियाना उप्पल यांच्या मुख्य भूमिका आहेत. सूत्रानुसार बाबा रामदेव छोट्या पडद्यावर एक युनिक शो घेऊन येण्याच्या विचारात आहेत. बाबा रामदेव शोला जज करताना बघावयास मिळणार आहेत. शोमध्ये ते महागुरूच्या भूमिकेत असतील. त्याचबरोबर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हीदेखील शोमध्ये जजच्या भूमिकेत असेल. या दोघांव्यतिरिक्त जज म्हणून गायक शेखर रविजानी, कनिका कपूर हेदेखील असतील. या रिअ‍ॅलिटी शोची कॉन्सेप्ट युनिक असल्याचे सांगितले जात आहे. कारण या शोचे वैशिष्ट्य म्हणजे बाबा रामदेव शोमध्ये महागुरूच्या भूमिकेत असतील. ते शोमध्ये बºयाचशा महत्त्वाच्या गोष्टींविषयी माहिती देणार आहेत. तर शोमधील स्पर्धक भजन गाताना दिसणार आहेत. स्पर्धकांच्या भजनामुळे शोमध्ये भक्तिमय वातावरण होईल, यात शंका नाही. हा शो ‘लाइफ ओके’ या चॅनेलवर टेलिकास्ट केला जाणार आहे. दरम्यान, हा शो कधी टेलिकास्ट केला जाईल, याबाबतचा खुलासा अद्यापपर्यंत केलेला नाही. या शोचा उद्देश तरुण पिढीला भक्तीचे महत्त्व पटवून देणे हा असेल. सध्या प्रेक्षकांना या शोची प्रतीक्षा असून, त्याच्या काही भागांची शूटिंग केल्याची माहिती समोर येत आहे.