Join us  

आयुषमान खुराणाची पत्नी करणार या चित्रपटाचे दिग्दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:05 PM

तुम्हारी सुलू आणि चीट इंडिया यांसारख्या चित्रपटांची निर्मिती टी सिरिज आणि इलिप्सिस एन्टरटेन्मेंटने मिळून केली होती. आता यानंतर ते लवकरच ते त्यांच्या तिसऱ्या चित्रपटाची घोषणा करणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ताहिरा कश्यप खुराणा करणार आहे.

आयुषमान खुराणाने विकी डोनर, शुभ मंगल सावधान, दम लगा के हैशा, मेरी प्यारी बिंदू, बरेली की बर्फी यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आयुषमान आज बॉलिवूडमध्ये एकाहून एक हिट चित्रपट देत असला तरी त्याच्या कारकिर्दीची सुरुवात ही छोट्या पडद्यापासून झाली आहे. त्याने छोट्या पडद्यावर अनेक वर्षं राज्य केले आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. एमटीव्ही रोडीजच्या अनेक सिझनचे त्याने सूत्रसंचालन केले आहे. आयुषमान बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच त्याचे लग्न झालेले होते. ताहिरा असे त्याच्या पत्नीचे नाव असून ती त्याची लहानपणापासूनची मैत्रीण आहे. ताहिरा केवळ १६ वर्षांची असताना त्या दोघांची पहिली भेट झाली होती. त्यांनी १२ वर्षांच्या मैत्रीनंतर २०११ मध्ये लग्न केले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

तुम्हारी सुलू आणि चीट इंडिया यांसारख्या चित्रपटांची निर्मिती टी सिरिज आणि इलिप्सिस एन्टरटेन्मेंटने मिळून केली होती. आता यानंतर ते लवकरच ते त्यांच्या तिसऱ्या चित्रपटाची घोषणा करणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ताहिरा कश्यप खुराणा करणार आहे. या चित्रपटाचे नाव काय असणार तसेच या चित्रपटात कोणते कलाकार मुख्य भूमिकेत असणार याबाबत या चित्रपटाच्या टीमने मौन राखणेच पसंत केले आहे. पण या चित्रपटाचे चित्रीकरण पुढील वर्षी सुरू होणार असून चित्रीकरण मुंबईत होणार असल्याचे कळतेय. 

ताहिराने दिग्दर्शन करण्याची ही काही पहिली वेळ नाही. तिने याआधी टॉफी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले होते. या माहितीपटाची निर्मिती आयुषमानने केली होती. आता ती एक दिग्दर्शिका म्हणून बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे. 

आयुषमान खुराणाची पत्नी बॉलिवूडमध्ये कार्यरत नसली तरी ती बॉलिवूडच्या पार्टींमध्ये, पुरस्कार सोहळ्यात त्याच्यासोबत आवर्जून पाहायला मिळते. आयुषमानला आजवर मिळालेल्या यशात ताहिराचा मोठा वाटा असल्याचे तो आवर्जून सांगतो. आयुषमाननंतर ताहिराला आता बॉलिवूडमध्ये यश मिळेल का हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

टॅग्स :आयुषमान खुराणा