Join us  

स्वप्नपूर्ती!! आयुष्यमान व अपारशक्ती खुराणाने खरेदी केलं आणखी एक घर, किंमत वाचून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 5:12 PM

गतवर्षी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मुंबईत प्रॉपर्टी घेतली. आता अभिनेता आयुष्यमान खुराणा (Ayushmann Khurrana) आणि त्याचा भाऊ अपारशक्ती खुराणा ( Aparshakti Khurana) यांनीही नवं घर घेतलं आहे.

स्वप्नांची नगरी म्हणजे मुंबईत. या स्वप्ननगरी स्वत:चं घर घेणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. अगदी सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. गतवर्षी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मुंबईत प्रॉपर्टी घेतली. आता अभिनेता आयुष्यमान खुराणा (Ayushmann Khurrana) आणि त्याचा भाऊ अपारशक्ती खुराणा ( Aparshakti Khurana) यांनीही नवं घर घेतलं आहे. दोन्ही भावांनी मुंबईच्या एकाच हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये घर खरेदी केल्याचं कळतंय.

मनी कंट्रोल या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, आयुष्यमानने अंधेरी वेस्टच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये Windsor Grande Residences  एक अलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे. हे अपार्टमेंट 20 व्या माळ्यावर आहेत. यासाठी आयुष्यमानने 19.30 कोटी रूपये मोजले. 4,027 स्क्वेअर फूटच्या या घरात चार गाड्यांच्या पार्किंगची सुविधा आहे. गेल्यावर्षी 29 नोव्हेंबरला हा खरेदी व्यवहार झाला. यासाठी स्टँप ड्युटीपोटी आयुष्यमानने 96.50 लाख रूपये दिले.

आयुष्यमान खुराणाचा भाऊ अपारशक्ती खुराणा यानेही याच कॉम्प्लेक्समध्ये एक अपार्टमेंट खरेदी केलं आहे. त्याची किंमत 7.25 कोटी आहे. 1,745 स्क्वेअर फूटाच्या या घरासाठी अपारशक्तीने 36.25 लाख रूपयांची स्टँप ड्युटी भरली. गतवर्षीच आयुष्यमान व अपारशक्ती यांनी पंचकुला येथे 9 कोटींची प्रॉपर्टी खरेदी केली होती.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अलीकडे आयुष्यमान खुराणाचा ‘चंदीगड करे आशिकी’ हा सिनेमा रिलीज झाला. लवकरच तो डॉक्टर जी, अनेक आणि अ‍ॅक्शन हिरो या चित्रपटात दिसणार आहे. हे तिन्ही सिनेमे यावर्षी रिलीज होणार आहेत. आयुष्यमान खुराणाने ‘विक्की डोनर’ या चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. त्याचा पहिलाच सिनेमा चांगला गाजला होता. 

टॅग्स :आयुषमान खुराणा