Join us  

१५ व्या वर्षी कलाविश्वात पदार्पण २३ व्या वर्षी लग्न, प्रेमासाठी सलमान खानच्या अभिनेत्रीने बदलला धर्म

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 11:32 AM

राजकीय नेत्याच्या मुलाशी निकाह करुन या अभिनेत्रीने इस्लाम धर्म स्वीकारला.

आयशा टाकिया ही एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जायची. तिने बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही काम केले आहे. लग्नानंतर आयशा बॉलिवूडमधून गायब आहे. वयाच्या चौथ्या वर्षी आयशाने मॉडेलिंग सुरु केले. वयाच्या १५ व्या वर्षी फाल्गुनी पाठकच्या ‘मेरी चूनर उड उड जाऐ’ या म्युझिक अल्बममध्ये ती झळकली. या अल्बममुळे आयशा अचानक प्रकाशझोतात आली होती. विशेष बाब म्हणजे आयशा केवळ १५ वर्षांची होती त्यावेळी एका जॅकेट तयार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीसाठी मॉडलिंग करण्याची ऑफर तिला मिळाली होती. अन् तिनं देखील ही ऑफर स्विकारली. २००१ साली या कामासाठी तिला तब्बल ३ कोटी रुपयांचं मानधन मिळालं होतं. आयशा आज तिचा वाढदिवस साजरा करते आहे. 

वयाच्या १५ वर्षीच कोट्यवधींची मालकीण झाली म्हणून आयशा त्यावेळी चर्चेत होती. आयशाचे वडील गुजराती तर आई ब्रिटीश आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये आली तेव्हा आयशाला हिंदीचा एकही शब्द बोलता येत नव्हता. पण अ‍ॅक्टिंग करिअरसाठी आयशा मोठ्या जिद्दीने हिंदी व तेलगू भाषा शिकली.

आयशा टाकियाने बॉलिवूडमध्ये खूप चांगल्या चित्रपटात काम केले आहे. तिने करियरची सुरूवात २००४ साली टारझन द वंडर कार चित्रपटातून केली. त्यानंतर ती बऱ्याच चित्रपटात झळकली. २००९ साली ती सलमान खानसोबत वॉण्टेंड चित्रपटात पहायला मिळाली. पुढे सलमान खानच्या 'वॉन्टेड' या चित्रपटाने आयशाला मोठी ओळख दिली.यानंतर दिल मांगे मोर, शादी नंबर १, कॅश, पाठशाला, दे ताली अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. 

आएशाने २००९ मध्ये समाजवादी पार्टीचे नेता अबु आजमी यांचा मुलगा फरहान आजमीशी निकाह केला. तेव्हा ती फक्त २३ वर्षांची होती. फरहान आजमी एक बिझनेसमन आहे आणि त्याचे मुंबईत हॉटेलही आहे. असं म्हणतात तेव्हा आएशा अनेकदा त्याला हॉटेलवर भेटायची. मात्र तिने नातं लपवून ठेवलं होतं. २००५ सालापासूनच दोघांमध्ये भेटीगाठी व्हायच्या. मात्र तेव्हा दोघांनी याचा सार्वजनिक स्वीकार केला नाही. २०१३ साली तिने मुलाला जन्म दिला. त्याचे नाव मिकेल असे ठेवण्यात आले. आपल्या क्युट मुलासोबतही तिने फोटो शेअर केले आहेत.

टॅग्स :आयशा टाकियासलमान खानसेलिब्रिटी