Join us  

विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात पडल्यामुळे आयुष्यभर सिंगल राहिल्या आशा पारेख, स्वत:केला होता खुलासा

By गीतांजली | Published: October 02, 2020 2:03 PM

आशा पारेख यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे दिले.

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांचा आज 78 वाढदिवस आहे. अभिनेत्री आशा पारेख यांचा आज (२ ऑक्टोबर) वाढदिवस. गुजरातच्या महुआ येथे मध्यवर्गीय गुजराती कुटुंबात आशा पारेख यांचा जन्म झाला. आशा पारेख यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. प्रोफेशनल लाईफ इतकेच त्यांचे पर्सनल लाईफ सुद्धा चर्चेत राहिले. दिग्गज निर्माते-दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्या सोबतचे त्यांचे नातं नेहमीच चर्चेत राहिले पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. एका मुलाखती दरम्यान याचा खुलासा त्यांनी स्वत: केला होता. 

 नासीर हुसैन यांनी अशा पारिख यांना ‘दिल देके देखो’साठी साईन केले. हा चित्रपट हिट झाला अन् आशा पारेख रातोरात स्टार झाल्यात. यानंतर नासीर हुसैन यांनी आशा यांना आपल्या सहा चित्रपटांसाठी साईन केले होते. ‘जब प्यार किसी से होता है’,‘फिर वो ही दिल लाया हंू’,‘तिसरी मंजिल’,‘बहारों के सपने’,‘प्यार का मौसम’,‘कारवां’ असे हे सहाही चित्रपट हिट ठरले होते.

एका मुलाखती दरम्यान आशा पारेख म्हणाल्या की , नासिर साहेब हे माझ्या आयुष्यात आलेले पहिले आणि शेवटचे पुरुष होते. त्यांच्यावर माझे खूप प्रेम होते. पण मला त्यांचे घर तोडायचे नव्हते. माझ्या आणि त्यांच्या कुटुंबात कधीच मतभेद झाले नाहीत. मला कधीच त्यांना त्यांच्या पत्नी आणि मुलांपासून विभक्त करायचे नव्हते. याच भीतीमुळे मी कधी त्यांच्यासोबत लग्न केले नाही.  

नासीर हुसैन जेव्हा आशा पारेख यांच्या प्रेमात पडले तेव्हा ते विवाहीत होते. त्यांना दोन मुलं होती. या गोष्टीचा उल्लेख आशा पारेख यांनी त्यांचे आत्मचरित्र द हिट गर्ल’मध्ये केला आहे. खालिद मोहम्मद लिखित हे आत्मचरित्र 2017मध्ये प्रकाशित झाले होते.  

टॅग्स :आशा पारेख