Join us  

Aryan Khan Drugs Case: आता Sherlyn Chopraने Shah Rukh Khanबाबत केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाली, "त्याच्या पार्टीत बॉलिवूड स्टार्सच्या पत्नी घेत होत्या व्हाईट पावडर’’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 12:39 PM

Aryan Khan Drugs Case: भिनेत्री शर्लिन चोप्रा हिने शाहरुख खानबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. तिने शाहरुख खानची आयपीएलमधील टीम असलेल्या केकेआरच्या पार्टीबाबत हा धक्कादायक दावा केला आहे.

मुंबई - बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान क्रूझवरील ड्रग्स पार्टीप्रकरणी सध्या एनसीबीच्या ताब्यात आहे. आर्यन खानसह आठ जणांवर ड्र्ग्सचे सेवन करण्याचा आणि त्याचा व्यापार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. (Aryan Khan Drugs Case) दरम्यान, अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने शाहरुख खानबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. तिने शाहरुख खानची आयपीएलमधील टीम असलेल्या केकेआरच्या पार्टीबाबत हा धक्कादायक दावा केला आहे. त्यात तिने शाहरुख खानच्या पार्टीमध्ये बॉलिवूड स्टार्सच्या पत्नी वॉशरूममध्ये व्हाईट पावडर घेत असल्याचा दावा केला आहे. (Now Sherlyn Chopra has made a big revelation about Shah Rukh Khan, saying, "The wives of Bollywood stars were taking white powder at his party.")

शर्लिन चोप्रा हिने सोशल मीडियावर यासंदर्भातील आपल्या जुन्या इंटरव्यूची व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये ती शाहरुख खानचा आयपीएलमधील संघ केकेआरच्या पार्टीचा उल्लेख करताना दिसत आहे.  हा व्हिडीओ तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये शर्लिन चोप्रा पार्टीबाबत सांगते की, डान्स करता करता थकल्यावर मी घामाघूम होऊन वॉशरूममध्ये गेले आणि वॉशरूमचा दरवाजा उघडला. जेव्हा मी दरवाजा उघडला तेव्हा तिथले दृश्य पाहून मला धक्का बसला. मी चुकीच्या जागी तर आले नाही ना असे मला वाटले. तेथे बॉलिवूड स्टार्सच्या पत्नी आरशासमोर उभ्या राहून व्हाईट पावडर घेत होत्या.

ती पुढे म्हणाली की, अचानक असं दृश्य माझ्यासमोर आलं, ज्यामुळे मला धक्का बसला. मी त्यांना पाहून हसले आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य समजले. मी पाहिले की, सर्वजण आपल्याच धुंदीत होते. त्यानंतर शाहरुख खान आणि त्याच्या मित्रांना भेटून मी तिथून काढता पाय घेतला. त्या दिवशी मला समजले की, बॉलिवूडमध्ये अशा प्रकारच्या पार्ट्या होतात. आता सोशल मीडियावर शर्लिन चोप्राचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.  

टॅग्स :शाहरुख खानआर्यन खानशर्लिन चोप्रामुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी