Join us

परफेक्ट दिसण्यासाठी कलाकारांची धडपड -सोनाक्षी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2016 17:26 IST

बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा वेगवेगळया भूमिका साकारून तिचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व सिद्ध करत असते. रोमँटिक, अ‍ॅक्शन, थ्रिलर अशा वेगवेगळ्या ...

बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा वेगवेगळया भूमिका साकारून तिचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व सिद्ध करत असते. रोमँटिक, अ‍ॅक्शन, थ्रिलर अशा वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये तिने तिचे नशीब आजमावून पाहिले आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या तिच्या ‘अकिरा’ चित्रपटाला चाहत्यांनी पसंत केले. आता तिला आगामी चित्रपट ‘नूर’ कडून खूप अपेक्षा आहेत.कलाकारांच्या स्ट्रगलविषयी ती सांगते,‘बी टाऊनच्या कलाकारांची परफेक्ट दिसण्यासाठी सतत धडपड सुरू असते. प्रत्येकाला त्याच्या परफेक्ट असण्याचा किती ताण आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अभिनेत्रींमधून मला नेहमी एक निरोगी व्यक्ती म्हणूनच वागविण्यात येते. तरूण मुली आम्हाला प्रेरणास्थानी मानतात, हे ठाऊक आहे. पण मी कुणाला चुकीचा सल्ला देऊ इच्छित नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्यात खरंच काही चांगले कार्य करायचे असेल तर तुम्ही निरोगी आणि आनंदी असणं अपेक्षित आहे.’ फोर्स २‘ चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केल्याने सध्या सोना खुश दिसतेय. चित्रपटाला अजून कमाई करता आली असती पण, चित्रपटाला मिळालेल्या कलेक्शनवर टीम खुश असल्याचे तिने सांगितले. ‘नूर’ मध्ये तिने पत्रकाराची भूमिका साकारली असून, तिला या नव्या क्षेत्राचा अनुभव घेऊन छान वाटतेय, अशी प्रतिक्रिया तिने दिली.