Join us  

उद्धटपणा भोवला की काय?, एका रात्रीत लोकप्रिय झालेली रानू मंडल आता जगतेय असे जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 1:34 PM

'एक प्यार का नगमा है' गाणे गाऊन लोकप्रिय झालेल्या रानू मंडलच्या जीवनात पुन्हा एकदा अंधार पसरला आहे.

कधी कुणाचं नशीब फळफळेल हे सांगता येत नाही. असंच काहीसे रानू मंडलच्या बाबतीत घडलं. काही सेकंदात व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रानू मंडलचे आयुष्यच बदलून गेले आणि रातोरात ती लोकप्रिय झाली. रानू मंडलला तिच्या सुरेल स्वरांमुळे असंख्य चाहते मिळाले. मात्र एक प्यार का नगमा है गाणे गाऊन लोकप्रिय झालेली रानू मंडलच्या जीवनात पुन्हा एकदा अंधार पसरला आहे. सध्या रानू मंडल काय करते आहे, हे जाणून घेऊयात.

बॉलिवूडचा प्रसिद्ध संगीतकार हिमेश रेशमियाने रानू मंडलला त्याच्या चित्रपटात गाण्याची संधी दिली होती. या चित्रपटातील रानू मंडलने गायलेले गाणे तेरी मेरी कहानी खूप हिट झाले होते. मात्र आता कोरोना व्हायरसमुळे रानू मंडलची अवस्था पुन्हा जैसे ते वैसे झाली आहे. असे समजते आहे की रानूला मुंबईत काहीच काम मिळत नाही.

सध्या ती राणाघाटमधील बेगोपारा येथे राहात असलेल्या तिच्या मावशीच्या घरी एकटी राहते आहे. मागील काही दिवसांत तिने जे काही कमाविले त्यावर तिचा उदरनिर्वाह सुरू असल्याचे समजते आहे. 

रानू मंडल लोकप्रियतेच्या शिखरावर असताना वाट्याला आलेले स्टारडम रानूला टिकवता आले नाही. तिची लोकप्रियता इतकी होती की, तिला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमा होत होती मात्र तिला हे सर्व हाताळता आले नाही. चाहत्यांसोबत गैरवर्तन, मीडियाच्या प्रतिनिधांना उलट उत्तरं देणं या सर्वामुळे तिचे जूने दिवस परत आले आहेत अशी चर्चा होती. आता ती पुन्हा जुने दिवस जगत असल्याचे समजल्यावर सोशल मीडियावर रानूबद्दल चर्चा होताना दिसते आहे. युजर्स म्हणत आहेत की चार दिन की चांदनी फिर अंधेरी रात.. तर काही युजर्स तिचा उद्धटपणा भोवला असल्याचे म्हणत होते.

रानू मंडल अचानक एण्टरमेंटच्या जगतातील सेंसेशन बनली. पश्चिम बंगालमधील रानाघाट रेल्वे स्टेशनवर लता मंगशेकर यांचे प्रसिद्ध गाणे एक प्यार का नगमा है गाऊन रानू मंडल एका रात्रीत लोकप्रिय झाली होती. त्यानंतर तिने हिमेश रेशमियासोबतही गाणे गायले. त्यानंतर काही रिएलिटी शोमध्येदेखील गेस्ट म्हणून बोलवण्यात आले होते. तसेच रानू मंडल काही पब्लिक इव्हेंटमध्येदेखील दिसली होती.

टॅग्स :राणू मंडलहिमेश रेशमिया