Join us  

Video: उद्धटपणा आला अंगाशी..! रानू मंडलला एका रात्रीत मिळाली होती लोकप्रियता, पुन्हा जगतेय गरीबीत

By तेजल गावडे | Published: October 21, 2020 12:06 PM

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळं रानू एका रात्रीत सेलिब्रिटी झाली होती.

फार कमी लोकांना अल्पावधीत लोकप्रियता मिळते. मात्र ही लोकप्रियता सर्वांनाच टिकवता येत नाही. असेच काहीसे झाले आहे रानू मंडलसोबत. ती इंटरनेट सेन्सेशन या नावाने ओळखले जात होते. रेल्वे स्थानकावर गाणे गाऊन उदरनिर्वाह करत होती. एका व्यक्तीने रानू मंडलचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यात ती गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे गाणे एक प्यार का नगमाचे गाताना दिसली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की सगळीकडे तिचीच चर्चा ऐकायला मिळत होती. रानू मंडलची तुलना लता मंगेशकर यांच्यासोबत होऊ लागली होती. इतकेच नाही तर गायक हिमेश रेशमियाने रानूला बॉलिवूडमध्ये गाण्याची संधी होती. मात्र आज रानू मंडल पुन्हा एकदा जुन्या आयुष्य जगते आहे.

रानू मंडल पुन्हा जुने आयुष्य जगते आहे. यासाठी तिचा अहंकार तिला नडला असल्याचे बोलले जाते. रानू मंडलला कमी वेळेत लोकप्रियता मिळाली होती. मात्र अहंकारामुळे तिला ते सांभाळते आले नाही. रानूला कित्येक वेळा चाहते व मीडियासोबत गैरवर्तणूक करताना पाहिले होते. बॉलिवूडमध्ये रानू मंडलला पहिला ब्रेक दिलेल्या संगीतकार हिमेश रेशमियासोबत भांडणे केल्याचे वृत्त समोर आले होते. पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात ती महिला चाहतीसोबत वाईट वर्तणूक करताना दिसली होती. 

रानू मंडलचा व्हायरलचा आणखीन एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ती मीडियाला तेवर दाखवताना दिसते आहे.

रानू मंडलचे गैरवर्तणूक पाहून लोकांना अजिबात आवडले नाही. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर रानूला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. रानू मंडलच्या वाट्याला आलेलं हे स्टारडम  टिकवता आले नाही. तिची लोकप्रियता इतकी होती की, तिला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमा होत होती पण तिला हे सर्व हाताळता आले नाही. चाहत्यांसोबत गैरवर्तन, मीडियाच्या प्रतिनिधांना उलट उत्तरं देणं यासर्वामुळं तिचे जूने दिवस परत आले आहेत अशी चर्चा आहे. रानूकडे आता आगामी कोणताच प्रोजेक्ट नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉकडाउननंतर रानू पुन्हा जुन्या आयुष्यात परतली आहे आणि सध्या ती जुन्या घरात राहत आहे.

टॅग्स :राणू मंडलहिमेश रेशमिया