Join us

जवानांना ‘फोर्स २’ टीमकडून श्रद्धांजली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2016 18:50 IST

चित्रपटाचे कथानक, उत्तम परफॉर्मन्स या सगळ्यांमुळे ‘फोर्स २’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. जॉन अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा यांची मुख्या ...

चित्रपटाचे कथानक, उत्तम परफॉर्मन्स या सगळ्यांमुळे ‘फोर्स २’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. जॉन अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा यांची मुख्या भूमिका असलेल्या या चित्रपटातील गाण्यांनाही यूट्यूबवर प्रचंड प्रतिसाद मिळतांना दिसतोय. अशातच चित्रपटाच्या टीमने एक आगळावेगळा निर्णय घेतला आहे.तो म्हणजे  ‘फोर्स २’चा ट्रेलर देशाच्या खऱ्या हिरोंना अर्थात शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून रिलीज करण्यात येणार आहे. या निमित्ताने चित्रपटाचे सर्व कलाकार दिल्लीतील ‘अमर जवान ज्योती’ येथे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणार आहेत.ट्रेलरच्या पहिल्याच स्लाईडमध्ये ‘देशासाठी बलिदान दिलेल्या सर्व भारतीय शहिद सैनिकांना  ‘फोर्स २’च्या टीमची श्रद्धांजली’ असे नमूद करण्यात आले आहे. ‘फोर्स २’च्या टीमचे हे पाऊल निश्चितपणे प्रशंसनीय आहे. आता केवळ ‘फोर्स २’ कधी रिलीज होतो, त्याची प्रतीक्षा आहे.