Join us  

 अर्जुन रामपालच्या प्रेयसीच्या भावाला अटक; ड्रग्जप्रकरणी NCBची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 10:52 AM

एनसीबीच्या  माहितीनुसार, अर्जुन रामपालची गर्लफ्रेन्ड गॅब्रिएला डेमिट्रिएड्सचा भाऊ अनेक ड्रग्ज पेडलर्सच्या संपर्कात होता.

ठळक मुद्देबॉलिवूड ड्रग्स रॅकेट प्रकरणात ही 23वी अटक आहे. यापूर्वी 21 नंबरचे आरोपी क्षितिज प्रसादचे जवळचे जय मधोक याला अटक करण्यात आली होती.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाच्या ड्रग्ज कनेक्शनचा तपास करणा-या नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) आणखी एक धडक कारवाई करत बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेन्ड गॅब्रिएला डेमिट्रिएड्सचा भाऊ एगीसलोस डेमेट्रिएड्स याला अटक केली.एनसीबीच्या  माहितीनुसार, त्याच्याकडून चरस आणि Alprazolam टॅबलेट जप्त करण्यात आल्या आहेत. तो अटक करण्यात आलेल्या अनेक ड्रग्ज पेडलर्सच्या संपर्कात होता.

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी ई-टाईम्सला सांगितल्यानुसार, अटक करण्यात आलेला आरोपी सुशांत-रिया प्रकरणात एगीसलोस हा ड्रग्ज पेडलर्सच्या संपर्कात होता. त्याचा थेट संबंध आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली. एगीसलोसला व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून मॅजिस्ट्रेटच्या समोर हजर करण्यात आले यानंतर त्याला दोन दिवसांच्या एनसीबी कस्टडीमध्ये पाठविण्यात आले आहे. 

एगीसलोस हा अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रिएला  हिचा भाऊ आहे. गॅब्रिएला व अर्जुन रामपाल अनेक वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहत आहेत. 18 जुलै 2019 रोजी गॅब्रिएलाने अर्जुनच्या मुलाला जन्म दिला. दोघांचे अद्याप लग्न झालेले नाही.

23 वी अटकबॉलिवूड ड्रग्स रॅकेट प्रकरणात ही 23वी अटक आहे. यापूर्वी 21 नंबरचे आरोपी क्षितिज प्रसादचे जवळचे जय मधोक याला अटक करण्यात आली होती. ड्रग्जप्रकरणी एनसीबीने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, कुक दीपेश सावंत, ड्रग्ज पेडलर जैद, बासित परिहार, क्षितीज प्रसार यांच्यासह 22 आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी रियाला अलीकडे कोर्टाने जामीन मंजूर केला होता.

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरावर ड्रग्जप्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी टाकला छापा 

अर्जुन रामपालच्या 'या' गर्लफ्रेंडबद्दल तुम्हाला माहित आहे का...?   

टॅग्स :अर्जुन रामपालनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो