Join us  

 गर्लफ्रेन्ड गॅब्रिएलासोबत लग्न करण्यास अर्जुन रामपालचा नकार; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 4:34 PM

Arjun Rampal : पहिली पत्नी मेहरला घटस्फोट दिल्यानंतर अर्जुन गॅब्रिएला डेमिट्रिएड्ससोबत राहतोय. अर्जुन व ग्रॅबिएला दोघांनी लग्न केलेलं नाही. पण लग्नाआधीच ती अर्जुनच्या मुलाची आई झाली आहे.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal )सध्या सिनेमांमुळे नाही तर पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो. तुम्हाला ठाऊक असेलच की, पहिली पत्नी मेहरला घटस्फोट दिल्यानंतर अर्जुन गॅब्रिएला डेमिट्रिएड्ससोबत  (Gabriella Demetriades)राहतोय.  पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर अर्जुनने गॅब्रिएलासोबतचे रिलेशनशिप जगजाहिर केलं होतं. अर्जुन व ग्रॅबिएला दोघांनी लग्न केलेलं नाही. पण लग्नाआधीच ती अर्जुनच्या मुलाची आई झाली आहे. मुलं झाल्यानंतर तरी अर्जुन व गॅब्रिएला लग्न करतील, असा चाहत्यांचा अंदाज होता. पण हे लग्न कधीच होणार नाही. होय, मी व गॅब्रिएला लग्न करणार नाही, असं अर्जुनने स्पष्ट केलं आहे.

पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन त्याच्या व त्याची पार्टनर गॅब्रिएलाबद्दल बोलला. मी आणि गॅब्रिएला आम्ही दोघांनी लग्न न करता मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला, तो एक मोठा निर्णय होता. या निर्णयानंतर अनेक स्तरावर आमच्या नात्यावर प्रतिक्रिया उमटल्या. पण त्यामुळे काहीही फरक पडला नाही. तुम्ही एक पब्लिक पर्सन आहात म्हटल्यावर तुमच्याबद्दल लोक बोलणारच. दुसरे काय विचार करतात, यापेक्षा आम्ही  आमच्या पर्सनल लाईफमधील गोष्टी एन्जॉय करतो, असं अर्जुन म्हणाला.

सामाजिक दबावापोटी लग्न करण्याची गरज वाटते का? असं विचारलं असता तो म्हणाला, लग्न तर आम्ही केलंय ना. हृदयाचं हृदयासोबत लग्न झालंय. यावर कायदोपत्री शिक्का मारण्याची गरज आहे? मला आणि गॅब्रिएलाला तरी लग्नाची गरज वाटत नाही. मी, ती आणि आमचा मुलगा आमच्या आयुष्यात आनंदी आहोत.

अर्जुनला पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. मेहर जेसिका आणि अर्जुनने एकमेकांसोबत 20 वर्ष संसार केला. पत्नी मेहर जेसिकासोबत विभक्त झाल्यानंतर अर्जुन गॅब्रिएलात गुंतला. हळूहळू दोघेही एकमेकांच्या जवळ आलेत. यानंतर अनेक इव्हेंटला दोघे एकत्र दिसू लागले. गॅब्रिएला एक आफ्रिकी मॉडेल आहे. ‘सोनाली केबल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. पण  बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही.

टॅग्स :अर्जुन रामपालगॅब्रिएला डेमेट्रिएड्स