Join us  

SEE PICS :  सुरु झाली अर्जुन व मलायकाच्या लग्नाची तयारी, हा घ्या पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 11:32 AM

अर्जुन व मलायका लवकरच लग्नबंधनात अडकणार, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. अर्थात दरवेळी या सगळ्या अफवा असल्याचे सांगून अर्जुन व मलायका या चर्चा धुडकावून लावतात. पण कदाचित यापुढे नाही...  

ठळक मुद्देकरण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये मलायकाने अर्जुनवरच्या प्रेमाची अप्रत्यक्षपणे कबुली दिली होती.

अर्जुन कपूरमलायका अरोरा यांचे नाते कुणापासूनही लपून राहिलेले नाही. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत, हेही नव्याने सांगण्याची गरज नाही. हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. अर्थात दरवेळी या सगळ्या अफवा असल्याचे सांगून अर्जुन व मलायका या चर्चा धुडकावून लावतात. पण कदाचित यापुढे नाही.  मलायका व अर्जुनचे ताजे फोटो बघितल्यानंतर या कपलच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे, असे म्हटले जात आहे.होय, शनिवारी रात्री उशीरा अर्जुन कपूर मलायकाच्या आई-वडिलांना भेटायला त्यांच्या घरी पोहोचला. मलायकाचे वडिल अनिल अरोरा आणि मलायकाची बहीण अमृता अरोरा हे दोघेही यावेळी दिसले.

अर्जुन इतक्या रात्री मलायकाच्या मॉम-डॅडच्या घरी का गेला, याबद्दल माहिती मिळू शकली नाही. पण यानंतर ही लग्नाची तयारी तर नाही ना, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. अर्जुन यावेळी काहीसा स्वत:त हरवलेला दिसला तर मलायका मात्र कूल दिसली. मीडियाला फोटो घेण्यापासूनही त्याने मनाई केली.

कपूर कुटुंबाने आधीच मलायका व अर्जुनच्या नात्याला परवानगी दिली आहे. आता कदाचित अरोरा कुटुंबानेही हे नाते मान्य केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मलायका व अर्जुनचे नाते आॅफिशिअल झाले तर आश्चर्य वाटायला नको.

अर्जून व मलायकाची रोमॅन्टिक केमिस्ट्री सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. सुरुवातीला दोघांनीही आपले नाते जगापासून लपवून ठेवले. पण अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अगदी बिनधास्त अर्जुनसोबत फिरू लागली.

त्यानंतर करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये मलायकाने अर्जुनवरच्या प्रेमाची अप्रत्यक्षपणे कबुली दिली होती. पाठोपाठ अर्जुन कपूरनेदेखील याच चॅट शोमध्ये अप्रत्यक्षपणे लग्नाचेही संकेत दिले होते. शोचा होस्ट करण जोहरने अर्जुनला त्याच्या रिलेशनशिप स्टेट्सविषयी प्रश्न विचारला असता मी सिंगल नाही, असे अर्जुन म्हणाला होता.   

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरा