Join us  

OMG! मलायका-अर्जुनची ‘रोमॅन्टिक’ डिनर डेट फ्लॉप, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 11:53 AM

रंग में भंग...

ठळक मुद्देअर्जून व मलायकाची रोमॅन्टिक केमिस्ट्री सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.

अर्जुन कपूरमलायका अरोरा  दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. दीर्घकाळापासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असलेले हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचीही चर्चा आहे. आधी मलायका व अर्जुनने आपले नाते जगापासून लपवले. पण आताश: दोघेही अगदी बिनधास्त फिरताना दिसतात. यावेळी दोघांचे बॉन्डिंग बघण्यासारखे असते. काल मुंबईच्या एका फेमस रेस्टॉरंटमध्ये मलायका व अर्जुन डिनरडेटवर पोहोचले. पण हे काय, दोघांचीही डिनर डेट पुरती फसली आणि या लव्ह बर्ड्सवर आल्या पावली माघारी परतण्याची वेळ आली.

होय, अर्जुन व मलायका डिनर डेटच्या मूडमध्ये होते. दोघेही अगदी आनंदात रेस्टॉरंटमध्ये दाखल झाले. पण बघतात काय तर, रेस्टॉरंटमध्ये एकही टेबल रिकामे नव्हते. संपूर्ण रेस्टॉरंट खचाखच भरलेले होते. टेबल न मिळाल्याने मलायका व अर्जुनच्या डिनर डेटचा प्लान फसला. अखेर दोघांनी जेवण पॅक करून नेण्याचा निर्णय घेतला. फोटोत मलायकाच्या हातात जेवणाचे पार्सल दिसतेय.

दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत अर्जुन नेव्ही ब्ल्यू टी-शर्टमध्ये दिसतोय तर मलायकाने व्हाईट कटआऊट ड्रेस घातला आहे.अर्जून व मलायकाची रोमॅन्टिक केमिस्ट्री सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. सुरुवातीला दोघांनीही आपले नाते जगापासून लपवून ठेवले. पण अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अगदी बिनधास्त अर्जुनसोबत फिरू लागली.

त्यानंतर करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये मलायकाने अर्जुनवरच्या प्रेमाची अप्रत्यक्षपणे कबुली दिली होती. पाठोपाठ अर्जुन कपूरनेदेखील याच चॅट शोमध्ये अप्रत्यक्षपणे लग्नाचेही संकेत दिले होते. शोचा होस्ट करण जोहरने अर्जुनला त्याच्या रिलेशनशिप स्टेट्सविषयी प्रश्न विचारला असता मी सिंगल नाही, असे अर्जुन म्हणाला होता.   

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरा