वडिलांना आधार द्यायला अर्जुन कपूर दुबईला रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 13:36 IST
श्रीदेवी मृत्यूप्रकरणात आता बोनी कपूर, मोहित मारवाह, कपूर कुटुंबियातील काही मंडळी आणि मारवाह कुटुंबातील काही मंडळींची चौकशी केली जाणार ...
वडिलांना आधार द्यायला अर्जुन कपूर दुबईला रवाना
श्रीदेवी मृत्यूप्रकरणात आता बोनी कपूर, मोहित मारवाह, कपूर कुटुंबियातील काही मंडळी आणि मारवाह कुटुंबातील काही मंडळींची चौकशी केली जाणार आहे. बोनी कपूर तसेच तिथे उपस्थित असलेल्या कपूर कुटुंबियांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत दुबईच्या बाहेर जाऊ नये असे त्यांना सांगण्यात आले आहे. श्रीदेवी यांच्या पार्थिवाचे पोस्टमार्टम झाले असून त्यांचा मृत्यू पाण्यात बुडल्यामुळे झाला असल्याचे फॉरेन्सिक अहवालात म्हणण्यात आले आहे. श्रीदेवी यांचा हृद्यविकाराने मृत्यू झाला असल्याची चर्चा शनिवारपासून होती. पण आता त्यांच्या मृत्यूप्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले आहे. श्रीदेवी यांचे पार्थिव रविवारपर्यंत मुंबईत येईल असे म्हटले जात होते. पण अद्यापही ते कपूर कुटुंबियाच्या स्वधीन करण्यात आलेले नाही. आता तर श्रीदेवी यांच्या फोन रेकॉर्डची तपासणी केली जाणार आहे. तसेच श्रीदेवी यांचे जुने मेडिकल रिपोर्ट देखील भारतातून मागवण्यात आले आहेत. श्रीदेवी यांच्यावर कोणते उपचार सुरू होते का याविषयी देखील ते जाणून घेणार आहेत. तसेच त्यांनी केलेल्या सर्जरीचे देखील रिपोर्ट मागण्यात आले आहेत. या सगळ्याचा त्यांच्या मृत्यूशी काही संबंध आहे का याची तपासणी देखील पोलिस करणार आहेत. या सगळ्यामुळे श्रीदेवी यांचे पार्थिव कुटुंबाला सुपूर्द करण्यास वेळ लागणार आहे. या सगळ्यामुळे कपूर कुटुंबिय खूपच चिंतेत आहे. बोनी कपूर तर या सगळ्या प्रकरणामुळे चांगलेच खचून गेले आहेत. त्यामुळे त्यांचा मुलगा अर्जुन कपूर हा वडिलांना आधार देण्यासाठी दुबईला रवाना झाला आहे. अर्जुन दुबईला गेला असल्याचे यश राज फिल्मसकडून मीडियाला सांगण्यात आले आहे. श्रीदेवी यांचे पार्थिव कुटुंबियांना सुपूर्द करण्यापर्यंत तो बोनी कपूर यांच्यासोबत राहाणार आहे. तसेच तो त्यांच्यासोबतच मुंबईला येणार आहे. श्रीदेवी यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी त्या गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. Also Read : कपूर कुटुंबियांना दुबईतून बाहेर जाण्यास करण्यात आली मनाई