Join us  

लाखभर प्रेक्षकांसमोर अरिजित सिंग MS DHONI च्या पाया पडला; नेटकऱ्यांनी त्याला डोक्यावर घेतले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 4:36 PM

अरिजित सिंगच्या परफॉर्मन्सदरम्यान महेंद्रसिंग धोनी स्टेजवर पोहोचला अन्...

IPL 2023 (IPL 2023) चा पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात सीएसकेचा ५ गडी राखून पराभव झाला. शुभमन गिलच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर गुजरातने हा सामना जिंकला. या उद्घाटन सोहळ्यात अनेक बॉलिवूड स्टार्सनी आपला जलवा दाखवला. त्यात रश्मिका मंदाना, तमन्ना भाटिया आणि अरिजित सिंग यांचा समावेश होता. सोहळ्यादरम्यानचे एक अप्रतिम फोटो कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

अरिजित सिंगच्या परफॉर्मन्सदरम्यान महेंद्रसिंग धोनी स्टेजवर पोहोचला. धोनी जेव्हा अरिजितला भेटू लागला तेव्हा अरिजितने त्याच्या पायाला स्पर्श केला. हे दृश्य पाहण्यासारखे होते. चाहते हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. चाहते अरिजितचे सोशल मीडियावर कौतुक करताना थकत नाहीत. यानंतर धोनीनेही अरिजितला उचलून मिठी मारली. 

इंडियन प्रीमियर लीग 16 (IPL 16) च्या उद्घाटन समारंभात, दक्षिण अभिनेत्री तमन्ना भाटियाने अरिजित सिंगनंतर मंचावर प्रवेश केला. तमन्नाने 'पुष्पा'मधील आयटम साँगवर धमाकेदार परफॉर्मन्स दिला, त्यानंतर तिने बॉलिवूड नंबर्सवर डान्स केला. तमन्ना भाटियानंतर रश्मिका मंदान्नाने जबरदस्त डान्स परफॉर्मन्स दिला.  

टॅग्स :एम. एस. धोनीआयपीएल २०२३