Join us

अनुष्काचा चाहत्यांना गोड सल्ला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2016 13:20 IST

‘सुल्तान’ मध्ये हरयाणातील पहलवानाची अनुष्का शर्माने साकारलेली भूमिका आठवतेय ना! अभिनय, संवादावरील प्रभुत्व, डान्स यांच्यामुळे तिचे काही मोजके चित्रपट ...

‘सुल्तान’ मध्ये हरयाणातील पहलवानाची अनुष्का शर्माने साकारलेली भूमिका आठवतेय ना! अभिनय, संवादावरील प्रभुत्व, डान्स यांच्यामुळे तिचे काही मोजके चित्रपट हिट झालेत. ‘सुल्तान’ नंतर आता तिचा ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपट चर्चेत आलाय तो तिच्या रणबीरसोबतच्या केमिस्ट्रीमुळे.. ती एक उत्तम अभिनेत्री तर आहेच..त्यापेक्षा ती एक उत्तम व्यक्ती आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत ती नेहमी कनेक्ट असते. त्यामुळे तिने तिच्या चाहत्यांना एक गोड सल्ला दिलाय म्हणे. २८ वर्षीय अनुष्काने टिवटरवर चाहत्यांना संदेश देतेय की,‘बी गुड पीपल. स्प्रेड लव्ह नॉट हेट्रेड. अ‍ॅण्ड डू थिंग्ज विदाऊट अजेंडास आॅलवेज.’ तसेच तिचा ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहणाऱ्या चाहत्यांचे आभार मानायलाही ती विसरत नाहीये. ती म्हणते,‘थँक यू गाईज!! लव्ह यू आॅल. थँक यू फॉर आॅल द लव्ह.’ ‘ऐ दिल हैं मुश्किल’ हा तिचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट पाकिस्तानी कलाकारांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. रणबीर कपूर आणि ऐश्वर्या रॉय बच्चन यांचे इंटिमेट सीन्स यांमुळे चित्रपटाला विरोध होत होता. परंतु, सेन्सॉर बोर्डाने काही सीन्सला कात्री लावल्याने चित्रपट रिलीज होण्यास अडथळा झाला नाही. ती सध्या ‘द रिंग’ चित्रपटाची शाहरूख खानसोबत शूटिंग करत आहे.}}}}