Join us

​अनुष्का शर्माच्या साडीची आणि ज्वेलरीची किंमत ऐकून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 12:33 IST

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी इटली येथे त्यांच्या ठरावीक मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केले. विराट आणि अनुष्का ...

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी इटली येथे त्यांच्या ठरावीक मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केले. विराट आणि अनुष्का हे दोघेही प्रचंड फेमस आहेत. त्या दोघांनी इटलीत लग्न केल्यानंतर २१ तारखेला त्यांच्या जवळच्या मित्रांसाठी दिल्लीत रिसेप्शन दिले होते आणि आता त्यांच्या क्रिकेट आणि बॉलिवूडच्या मित्रमैत्रिणींसाठी त्यांनी २६ तारखेला रिसेप्शन ठेवले आहे. अनुष्काने दिल्लीच्या रिसेप्शनमध्ये एक सुंदर लाल रंगाची बनासरी साडी नेसली होती आणि त्यावर भरजरीत दागिने घातले होते. या लूकमध्ये अनुष्का खूपच सुंदर दिसत होती. तिच्या या लूकची सोशल मीडियामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. अनुष्काने या रिसेप्शनला भागेत कंकूदेखील भरले होते. तसेच केसात गजरा देखील माळला होता. अनुष्काने लग्नात सब्यासाचीने डिझाइन केलेले कपडे घातले होते. लग्नातील तिचा लहेंगा खूपच छान होता. हा लहेंगा देखील सगळ्यांना आवडला होता. अनुष्काने रिसेप्शनलादेखील सब्यासाचीने डिझाइन केलेली साडी घातली होती. या साडीला सोन्याची जर होती. ही साडी हाताने बनवण्यात आली असून ही साडी बनवताना सोन्याचा वापर करण्यात आला होता. ही साडी बनवण्यासाठी कारगिरांनी अनेक महिने लागले होते. या साडीची किंमत पाच लाखांहून देखील जास्त आहे. तसेच तिने घातलेली दागिने देखील प्रचंड महाग होते. अनुष्काने घातलेल्या केवळ झुमक्याची किंमत ही २५-३० लाख रूपये असल्याचे म्हटले जाते. अनुष्का शर्माने रब ने बना दी जोडी या चित्रपटापासून तिच्या करियरला सुरुवात केली. तिने तिच्या कारकिर्दीत पीके, सुलतान, बँड बाजा बरात, जब तक है जान, लेडिज व्हर्सेस रिकी बहल, एनएच १०, दिल धडकन दो यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. अनुष्का आणि विराटची ओळख २०१३ ला एका जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती आणि त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. गेल्या चार वर्षांपासून त्यांचे अफेअर सुरू असून त्यांनी नुकतेच इटलीत लग्न केले. Also Read : अनुष्का शर्माने रिसेप्शनमध्येही केली दीपिका पादुकोणची ‘कॉपी’!