Join us  

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलिया भट, अनुष्का शर्मा आणि जान्हवी कपूरनं केलं चाहत्यांना हे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2022 7:59 PM

गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना विषाणूने देशात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना विषाणूने देशात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.ओमिक्रॉन व्हॅरेंटची प्रकरण  झपाट्याने वाढत आहेत. बॉलिवूडपासून ते सर्वसामान्यांपर्यंत अनेकजण याच्या विळख्यात आले आहेत.दिवसेंदिवस पॉझिटीव्ह येणाऱ्या संख्या झपाट्याने वाढतेय. 

आज बॉलीवूड स्टार जान्हवी कपूर, आलिया भट्टअनुष्का शर्मा यांनी त्यांच्या चाहत्यांना आठवण करून देण्यासाठी त्यांच्या Instagrams वर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात या अभिनेत्रींनी कधीही न संपणारी ही लढाई जिंकायची असेल तर आपण जबाबदारीनं वागावं लागले असे लिहिले आहे. 

आलिया भट, जान्हवी कपूर आणि अनुष्का शर्माने त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर पोस्ट शेअर केली आहे.   ज्यामध्ये भारताची कोविड -19 आकडेवारी आणि मुंबई महापालिका आयोगाचे आवाहन शेअर केले. अहवालानुसार, मुंबईत 8000 हून अधिक प्रकरणे आढळून आली, त्यापैकी 89% सुदैवाने लक्षणे नसलेली आढळली.

पोस्टनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनीही होम क्वारंटाईन केलेल्या सर्व रुग्णांना संसर्गाचा पुढील प्रसार होण्याचा धोका कमी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.शेवटी, पोस्टमध्ये म्हटले आहे की आत्ता घाबरण्याची वेळ नाही, तरीही परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून आपण सर्वांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

टॅग्स :आलिया भटअनुष्का शर्माजान्हवी कपूर