Join us

'या' शहरात विराट कोहलीसोबत अनुष्का शर्मा सेलिब्रेट करणार तिचा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 14:42 IST

अनुष्का शर्मा 'झिरो'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे तर विराट कोहली आयपीएलच्या मॅचेसमध्ये बिझी आहे. दोघांना एकमेकांसोबत खूप वेळा एकत्र स्पेंट ...

अनुष्का शर्मा 'झिरो'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे तर विराट कोहली आयपीएलच्या मॅचेसमध्ये बिझी आहे. दोघांना एकमेकांसोबत खूप वेळा एकत्र स्पेंट करायला मिळतच नाही. मे महिन्यात अनुष्का शर्माचा वाढदिवस आहे आणि तिला या खास दिवशी विराट कोहलीसोबत राहायचे आहे.     सूत्रांच्या माहितीनुसार एप्रिलच्या लास्ट विकमध्ये शूटिंगमधून ब्रेक घेऊन बेंगळुरुला रवाना होणार आहे. आपला 30वा वाढदिवस ती कोहली सोबत सेलिब्रेट करणार आहे. बर्थ डेच्या पार्टीत फक्त जवळचे मित्र आणि नातेवाईक सहभागी होणार आहेत. सूत्रांनुसार दिल्लीहुन विराट कोहलीची फॅमिलीसुद्धा सुनेच्या बर्थ डे पार्टीत सामिल होणार आहेत. 1 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि मुंबई इंडियंस यांच्यात सामना होणार आहे. अनुष्काच्या वाढदिवसाला विराट काय गिफ्ट देणार याची जास्त चर्चा आहे. लग्नानंतरचा पहिला वाढदिवस असल्याने तो खास होण्यासाठी काहीतरी मोठं सरप्राईज देण्याची प्लॉन विराटनं नक्कीच केला असेल यात काही शंका नाही. मात्र ते सरप्राईज नक्की काय आहे हे कळण्यासाठी आपल्याला 1 मे पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे.ALSO READ :  अनुष्का शर्माला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीरबर्थ डे सेलिब्रेट करुन झाल्यावर अनुष्का युएसला रवाना होणार आहे. युएसमध्ये जवळपास दीड महिना राहुन ती 'झिरो'ची शूटिंग पूर्ण करणार आहे. सध्या अनुष्का झिरोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी तिचा झिरोच्या सेटवरचा फोटो व्हायरल झाला होता. झिरोमध्ये अनुष्कासह शाहरुख खान आणि कॅटरिना कैफची देखील महत्त्वाची भूमिका आहे. शाहरुख खान या चित्रपटात एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील  शाहरूखची व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच, ही बुटकी व्यक्ती दुस-या लोकांमध्ये प्रेम वाढवून त्यांच्यातील दुवा ठरेल. ‘गेम आॅफ थ्रोन्स’ प्रेक्षकांच्या आवडीची शृंखला आहे. या चित्रपटात अनेक व्हिज्युअल इफेक्ट्स दिसणार आहेत.