अनुष्का शर्मा दिर्घकाळापासून मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. ती शेवटची 2018 साली शाहरुख खान सोबत 'झिरो' चित्रपटात दिसली होती आणि त्यानंतर 2022 मध्ये 'काला' या चित्रपटात तिचा कॅमिओ होता. चार वर्षांनंतर अनुष्का माजी भारतीय क्रिकेटपटू झुलन गोस्वामी हिचा बायोपिक 'चकदा एक्सप्रेस'मधून मोठ्या पडद्यावर परतणार आहे. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, अनुष्का शर्माने एक मोठी घोषणा केली आहे, जी ऐकून चाहते थोडे निराश झाले आहेत.
अनुष्का शर्माचे म्हणणे आहे की, आता ती वर्षातून केवळ एकच सिनेमा करणार आहे. सध्या ती तिचा केंद्र बिंदू कुटुंब आणि मुलगी वामिका आहे. बंगळुरुमधील एका इव्हेंटमध्ये अनुष्का म्हणाली, या वयात माझ्या मुलीला माझ्या वेळ हवा आहे हे मला माहिती आहे. विराट एक चांगला बाबा आहे. पण या (वामिका) वयात तिला सगळ्यात जास्त माझी गरज आहे. आम्ही हे ओळखतो. त्यामुळे मी हे निर्णय घेतला आहे.
अनुष्का म्हणाली की, मला अभिनय करण्यात आनंद मिळतो पण पूर्वी जेवढे चित्रपट मी करत होते तेवढे मला करायचे नाहीत. आता मला वर्षातून एक चित्रपट करायचा आहे. माझ्या जीवनात मला समतोल साधायचा आहे आणि माझ्या कुटुंबाला वेळ द्यायचा आहे.'