Join us  

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली एकत्र येऊन करतायेत 'हा' बिझनेस !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 5:58 AM

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने आजपर्यंत जगासमोर भलेही आपले नाते स्वीकारले नसले तरी अनेक ठिकाणी त्यांना एकमेंकाच्या हातात हात ...

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने आजपर्यंत जगासमोर भलेही आपले नाते स्वीकारले नसले तरी अनेक ठिकाणी त्यांना एकमेंकाच्या हातात हात घालून फिरताना बघितले आहे. बऱ्याच फॅन्सना त्यांची जोडी आवडते सुद्धा. त्यांचे फॅन्स नेहमीच ते कधी लग्न करणार ?, कुठे फिरायला जातात ? या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यात इंटरेस्ट असतात. बऱ्याच काळ ते एकमेकांना टेड करतायेत. काही ना काही गोष्टीला घेऊन ते नेहमीच चर्चेत असतात. या दोघांशी रिलेटेड आता आणखीन एक गोष्ट समोर आली आहे.  मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार दोघे प्रॉपर्टीमध्ये एकत्र पैसे गुंतवता येत. ऐवढचे नाही तर दोघांनी मुंबईतल्या एका प्रॉपर्टीमध्ये पैसे सुद्धा गुंतवले आहेत. अनुष्का आणि विराटने दिल्लीसुद्धा जागा खरेदी केली आहे. आता हे वाचून तुम्हाला वाटले असेल की दोघे लवकरच  लग्न करणार आहेत तर जरा थांबा दोघांची ऐवढ्यात लग्न करण्याचा कोणताच विचार नाही आहे. दोघांनी विकत घेतलेल्या जागेंवर रेस्टोरेंट उघडण्याचा विचार केला आहे. लवकरच त्यांच्या या नव्या रेस्टोरेंटचे कामदेखील सुरु होणार असल्याचे समजते आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यात दोघे ही ट्रेटिशनल लूकमध्ये दिसले होते. या फोटोंना बघून दोघांनी साखरपुडा तर नाही केला अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर हा सगळा खटाटोप एक अॅड शूटसाठी केला असल्याचे समोर आले. विराट नेहमीच अनुष्कासोबतचे त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो मात्र कधी ही आपले नातं तो अधिकृतपणे स्वीकारत नाही.  ALSO READ : ​विराट कोहली अन् अनुष्का शर्मा यांच्यात चाललेयं तरी काय?दोघे नेहमीच एकत्र व्हेकेशनवर सुद्धा जाताना स्पॉट झाले आहेत. अनेक मॉचेस दरम्यान अनुष्का त्याला भेटण्यासाठी परदेशी जाताना हि दिसली आहे. विराट कोहली टीम इंडियाचा कॅप्टन आहे तर अनुष्का बॉलिवूडमधली टॉपची अभिनेत्री आहे. विराट कोहली अनुष्काला लाडाने ‘नुष्की’ या नावाने हाक मारतो. अनुष्काचा शाहरुख खानसोबत आलेला जब हैरी मेट सेजल चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवू शकला नाही.