Join us  

बॉलिवूडला आणखी एक धक्का, ज्येष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 4:00 PM

कुमकुम यांनी १०० हून जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुमकुम यांनी १०० हून जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

कुमकुम यांचे सकाळी निधन झाले असून या संबंधीची अधिकृत माहिती नावेद जाफरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता जगदीप यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. नावेद हे त्यांचे सुपुत्र व प्रसिद्ध अभिनेता जावेद जाफरी यांचे भाऊ आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कुमकुम या आजारी होत्या. मुंबईमध्ये लिकिंग रोडवर त्यांचा बंगला होता. ज्याचे नाव कुमकुम असे ठेवण्यात आले होते. पुढे तो बंगला जमीनदोस्त झाला आणि तिथे इमारत बांधण्यात आली. 

कुमकुम यांनी हिंदी सिनेसृष्टीतील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. किशोर कुमार आणि गुरू दत्त यांच्यासोबतची कुमकुम यांनी काम केले आहे. मिस्टर एक्स इन बॉम्बे (१९६४), मदर इंडिया (१९५७), सन ऑफ इंडिया (१९६२), कोहिनूर (१९६०), उजाला, नया दौर, श्रीमान फंटूश, एक सपेरा एक लुटेरा यांसारख्या चित्रपटांमध्ये कुमकुम यांनी काम केले होते.

टॅग्स :जावेद जाफरी