Join us  

आणखी एका अभिनेत्याने केली आत्महत्या, इंद्र कुमारने गळफास लावून संपवली जीवनयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 10:58 AM

अभिनेता संदीप नाहरनंतर आता आणखी एका अभिनेत्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

बॉलिवूड अभिनेता संदीप नाहरने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समजते आहे. तमीळ टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अभिनेता इंद्र कुमारने गळफास लावून आत्महत्या केली आहे. चेन्नईतील त्याच्या मित्राच्या घरी सकाळी तो मृतावस्थेत आढळला आहे. 

तमीळ टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अभिनेता इंद्र कुमारने गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्याची बॉडी चेन्नईतील त्याच्या मित्राच्या घरी सकाळी सापडले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंद्र कुमार आपल्या मित्राला भेटण्यासाठी आला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो मृतावस्थेत आढळला. त्याच्या मित्राला जेव्हा समजले तेव्हा त्याने पोलिसांना कळवले. त्याचे शव पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांना त्याच्या मित्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी इंद्र कुमा चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो त्याच्या मित्राच्या घरी एकटाच होता. जेव्हा सकाळी घरी आल्यावर त्याच्या मित्राने दरवाजा वाजवला तेव्हा त्याला काहीच उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्याने दरवाजा खोलला तेव्हा इंद्र कुमार मृतावस्थेत दिसला.अभिनेता इंद्र कुमारच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांना तिथे कोणतीच सुसाइड नोट सापडली नाही. असे म्हटले जात आहे की इंद्र कुमार मालिकेत काम करत होता आणि काही नवीन संधीच्या शोधात होता. त्याला काम मिळत नव्हते त्यामुळे तो टेन्शनमध्ये होता. तो विवाहित असून त्याला एक मुलगादेखील आहे.

टॅग्स :संदीप नहार