Join us  

अंकिता लोखंडेचे बोल्ड फोटोशूट! पाहा, फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 11:35 AM

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे लोकप्रीय झालेली अंकिता लोखंडे ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतेय. 

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतेय. साहजिकचं यामुळे अंकिता जाम आनंदी आहे. याच आनंदाच्या भरात एका पाठोपाठ एक असे सेक्सी अन् बोल्ड फोटोशूट करण्याचा धडाका तिने लावलाय. आज आम्ही अंकिताच्या ताज्या फोटोशूटचे काही बोल्ड फोटो घेऊन आलो आहोत.

अंकिताने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. काहीच तासांत या फोटोंना ३० हजारांवर व्ह्युज आणि लाईक्स मिळाले आहेत.

निश्चितपणे अंकिता या फोटोतून प्रचंड ग्लॅमरस दिसतेय. तुम्हीही अंकिताचे हे फोटो पाहा आणि ते कसे वाटलेत, ते जरूर लिहा.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे लोकप्रीय झालेली अंकिता लोखंडे ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतेय. यात अंकिता झलकारी बाईची भूमिका साकारताना दिसणार आहे. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या झलकारीबाईने आपल्या शौर्याने आणि बुद्धिचातुर्याने राणी लक्ष्मीबाईच्या निकटवतीर्यांमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त केले होते.   इंग्रज सेनानी ह्यू रोज याच्या सैन्याने झाशीच्या किल्ल्यावर निकराचा हल्ला केला असता, झलकारीबाईच्या सल्ल््यानुसार राणीने झाशीचा किल्ला रात्रीच्या अंधारात सोडला. यादरम्यान झलकारीबाई यांनी राणीप्रमाणे वेश धारण करून ह्यू रोजच्या सैन्याशी युद्ध केले. पण ते नाटक इंग्रज सैनिकांना समजले. त्यांनी झलकारीबाईला पकडले व फासावर लटकवले होते.  या चित्रपटाशिवाय संजय दत्तसोबतही तिने एक चित्रपट साईन केल्याची खबर आहे. यात ती महिला पोलिसाची भूमिका साकारणार असेही कळतेय.

 

टॅग्स :माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी