मिस्ट्री गर्लसोबत बघावयास मिळाला अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन; कॅमेरे बघताच बदलले मार्ग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:53 IST
अनिल कपूरचा मुलगा आणि अभिनेता हर्षवर्धन कपूर नुकताच एका मिस्ट्री गर्लसोबत बघावयास मिळाला. सोमवारच्या सायंकाळी हर्षवर्धन एका रेस्टॉरंटमध्ये मिस्ट्री गर्लसोबत डिनर करण्यासाठी पोहोचला होता. येथून बाहेर पडताना तो कॅमेºयात कैद झाला. मात्र कॅमेरे दिसताच दोघेही वेगवेगळ्या मार्गाने रवाना झाले. दरम्यान, असा अंदाज लावला जात आहे की, ही मिस्ट्री गर्ल अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आलिया फर्निचरवाला असावी.
मिस्ट्री गर्लसोबत बघावयास मिळाला अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन; कॅमेरे बघताच बदलले मार्ग!
अनिल कपूरचा मुलगा आणि अभिनेता हर्षवर्धन कपूर नुकताच एका मिस्ट्री गर्लसोबत बघावयास मिळाला. सोमवारच्या सायंकाळी हर्षवर्धन एका रेस्टॉरंटमध्ये मिस्ट्री गर्लसोबत डिनर करण्यासाठी पोहोचला होता. येथून बाहेर पडताना तो कॅमेºयात कैद झाला. मात्र कॅमेरे दिसताच दोघेही वेगवेगळ्या मार्गाने रवाना झाले. दरम्यान, असा अंदाज लावला जात आहे की, ही मिस्ट्री गर्ल अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आलिया फर्निचरवाला असावी. हर्षवर्धनचे नाव सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिच्याशीदेखील जोडले गेले आहे. दोघांना बºयाचदा एकत्र बघण्यात आले आहे, त्यामुळेच त्यांच्या लिंकअपच्या बातम्या सातत्याने समोर येत होत्या. मात्र हर्षवर्धन आणि साराकडून याविषयी कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नाही. हर्षवर्धनने ‘मिर्झिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. दरम्यान, हर्षवर्धनचे मिस्ट्री गर्लसोबतचे फोटो सातत्याने व्हायरल होत आहेत.