Join us  

तिच्यासाठी कायपण! Neha Dhupia ला इम्प्रेस करण्यासाठी Angad Bedi ला काढावं लागलं होतं लोन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 5:20 PM

बॉलिवूड अभिनेता अंगद बेदी (Angad Bedi) आणि नेहा धुपिया (Neha Dhupia) 2018 मध्ये लग्न बंधनात अडकले.

बॉलिवूड अभिनेता अंगद बेदी  (Angad Bedi) आणि नेहा धुपिया (Neha Dhupia)  2018 मध्ये विवाहबद्ध झाले आणि आता ते दोन मुलांचे आई-बाबादेखील झालेत. लग्नापूर्वी अंगद आणि नेहाने त्यांचे अफेअर बरेच दिवस लपवून ठेवले होते. मात्र, नेहाने अंगदचा प्रस्ताव इतक्या सहजासहजी स्वीकारला नाही. आता अंगदने खुलासा केला आहे की, नेहाला इम्प्रेस करण्यासाठी त्याने एक कारही खरेदी केली होती.

अंगदने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा तो नेहा धुपियाला पहिल्यांदा भेटला तेव्हा त्याने लग्न करायचे ठरवून टाकले होते. अंगदकडे त्यावेळी पैसे नव्हते. अंगदने पुढे सांगितले की, त्यावेळी नेहा बीएमडब्ल्यू कारमध्ये फिरायची. त्यामुळे अंगदने पहिली कार घेण्यासाठी कर्ज घेतले. त्याने सांगितले की नेहा हिरोईन होती आणि तिने स्वतःची चांगली ओळख निर्माण केली होती, म्हणून अंगदने आपलं स्टेटस दाखवण्यासाठी लोनवर कार खरेदी केली होती.

नेहा धुपिया लग्नाआधीच प्रेग्नंट होती. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की ती प्रेग्नेंट होती जेव्हा अंगद तिच्या आई-वडिलांकडे लग्नाबद्दल बोलण्यासाठी गेला होता. सुरुवातीला अंगदसोबतच्या लग्नाबद्दल तिच्या पालकांनी नाराजी व्यक्त केली होती. नेहाच्या  लग्नाच्या काही महिन्यांनंतर नेहा आणि अंगद नोव्हेंबर 2018 मध्ये त्यांची मुलगी मेहरचे जन्म झाला. यानंतर नेहा धुपियाने एका मुलाला जन्म दिला आहे, ज्याचे नाव तिने गुरिक ठेवले आहे.

 वर्कफ्रंटवरबाबत बोलायचे झाले तर, नेहा धुपिया लवकरच 'ए थर्सडे' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात यामी गौतम, डिंपल कपाडिया आणि अतुल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट बेहजाद खंबाटा यांनी दिग्दर्शित केला आहे आणि डिस्ने प्लस हॉटस्टारवर 17 फेब्रुवारी 2022 रोजी रिलीज होणार आहे.

टॅग्स :नेहा धुपियाअंगद बेदी