Join us  

....आणि युवी झाला हेजलचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2016 2:51 PM

फुलांच्या माळा, डेकोरेशन, दिव्यांची रोषणाई, आप्तेष्टांची लगबग, अस्सल पंजाबी थाटमाट, आतषबाजी असंच काहीसं चित्र भारतीय क्रिकेटर युवराज सिंग आणि ...

फुलांच्या माळा, डेकोरेशन, दिव्यांची रोषणाई, आप्तेष्टांची लगबग, अस्सल पंजाबी थाटमाट, आतषबाजी असंच काहीसं चित्र भारतीय क्रिकेटर युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल कीच यांच्या विवाहप्रसंगी पहावयास मिळालं. ‘ते’ दोघे विवाहबंधनात केव्हा अडकणार? अशी उत्सुकता क्रिकेटजगतातील खेळाडू, कलाकार, चाहतावर्ग कित्येक दिवसांपासून  लागली होती. अखेर काल हे दोन प्रेमी युगुल एकमेकांचे झाले. चंदीगढ येथील फतेगड साहिब गुरूद्वारा येथे युवी आणि हेजलच्या लग्नाचा हा नयनरम्य सोहळा पार पडला. डिझायनर जे.जे. वलया यांनी डिझाईन केलेले युवी-हेजलचे ड्रेसेस सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदूच ठरले. उद्या दि. २ डिसेंबरला त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन चंदीगढ आणि गोवा येथे पार पडणार आहे. लग्नापूर्वीचे विधी हळदी, मेहंदी या कार्यक्रमापासून ते लग्नापर्यंतच्या सर्व फोटोंना सोशल साईट्सवर प्रचंड लाईक्स मिळत आहेत. त्यांच्या फोटोंची एक झलक खास तुमच्यासाठी :              हळदीचा विधी :लग्नाकार्यात हळदीचा विधी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. नवरदेव-नवरीला जोपर्यंत हळद लागत नाही तोपर्यंत नवरदेव नवरी वाटतच नाहीत. युवराजला हळद लावण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. त्याचे मित्रमंडळ, नातेवाईक आल्यानंतर हा विधी राहिला नाही तर संपूर्ण सेलिब्रेशनच झालं. या विधीवेळचा युवराजला हळद लागतानांचा एक फोटो :मेहंदी रची हैं हाथों में : हातावर मेहंदी लागेपर्यंत नवरी नसते असा समज आपल्याकडे आहे. युवराजची पत्नी होण्यासाठी आतुर असलेल्या हेजल कीचला खास पंजाबी स्टाईलची मेहंदी लावण्यात आली होती. ती मेहंदी एवढी सुरेख होती की स्वत: युवराजही त्या मेहंदीवर आणि हेजलवर फिदा झाला. हे पाहा :                                                            दुल्हेराजाचे आगमन :नवरदेव केव्हा येणार? अशी हुरहूर लग्नाच्या ठिकाणी उपस्थित सर्वांनाच लागलेली असते. युवराजच्या लग्नाचीही तीच खासियत होती. सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतांना युवीची एन्ट्री झाली. पंजाबी मुंडा युवी पारंपारिक पंजाबी वेशभूषेत गुरूद्वारा येथे आला. त्यावेळी त्याच्यासोबत मित्रमंडळी, नातेवाईक ही वऱ्हाडी मंडळीही आली. लग्नाचा पारंपारिक सोहळा :लग्न म्हटल्यावर सर्वकाही आपल्या जुन्या प्रथा, परंपरेनुसारच होत असते. लाल रंगाचा कुर्ता पायजमा आणि लाल रंगाचा घागरा घालून वधूवरांनी विधी पूर्ण केले. थोरामोठ्यांच्या आशीर्वादात आणि प्रार्थनेत लग्नाचा विधी पार पडला. यावेळी युवी आणि हेजल हे खऱ्या अर्थाने पती-पत्नी झाले. दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद यावेळी ओसंडून वाहत होता.