..आणि म्हणून ऐश्वर्या राय बच्चनने चिरंजीवीसोबत काम करण्यास दिला नकार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 12:29 IST
आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्या राय बच्चनने बॉलिवूडमधून काही काळ ब्रेक घेतला होता. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूरच्या ऐ दिल ...
..आणि म्हणून ऐश्वर्या राय बच्चनने चिरंजीवीसोबत काम करण्यास दिला नकार ?
आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्या राय बच्चनने बॉलिवूडमधून काही काळ ब्रेक घेतला होता. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूरच्या ऐ दिल है मुश्किलमध्ये ती झळकली होती. ए दिल है मुश्किल फ्लॉप झाल्यामुळे आपल्या सेकंड इनिंगला घेऊन ऐश्वर्या काहीशी अर्लट झाली आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये. नुकतेच तिचा आगामी चित्रपट फन्ने खानच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. यात तिच्यासोबत अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका आहेत. एका मोठ्या ब्रेकनंतर ऐश्वर्या आणि अनिल कपूर एकत्र दिसणार आहे. तर या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यात ती तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या राजकुमार रावसोबत रोमांस करताना दिसणार आहे. मात्र ऐश्वर्याने चिरंजीवीसोबत चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याचे समजते आहे. ALSO READ : श्रीदेवी -ऐश्वर्या राय यांनी मला नकार दिला! जाणून घ्या, कुठल्या नकाराबद्दल बोलतोय सनी देओल!!साऊथचा सुपरस्टार असलेल्या चिरंजीवीसोबत 'से रा नरसिंगा रेड्डी'तील भूमिकेसाठी ऐश्वर्याला अप्रोच करण्यात आले होते. मात्र ऐश्वर्याने ही भूमिका करण्यास मानधनचा आकडा इतका मोठा सांगितला की पैशांवरुन बोलणी फिस्कटली. ऐश्वर्याने वाईटपणा घ्यायाचा नव्हता त्यामुळे तिने सरळ चिरंजीवीच्या पत्नीची भूमिका साकारण्यासाठी त्या चित्रपटात 9 कोटींचे मानधन मागितले. ऐश्वर्याला आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अभिनेत्यांसोबत काम करायचे नसल्याचे कळते आहे. काही महिन्यांपूर्वी मीडिया रिपोर्टनुसार अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या 'अभिमान'च्या रिमेकसाठी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांना ऑफर करण्यात आला होता. अभिषेकच्या म्हणण्यानुसार अशा क्लासिक चित्रपटांना हात लावू नये. म्हणून त्यांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. मात्र या दोघांनी हे करण्यास नकार दिला होता. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या आणि अभिषेकने न्यूयॉर्कमध्ये आपला नवा आशियाना खरेदी केला आहे.