Join us

... आणि अशी रंगते कपूर कुटुंबाची मैफील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 08:42 IST

आदर जैन कैदी बँड या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. राज कपूर यांचा नातू असल्याने त्याच्याकडून सगळ्यांच्याच अपेक्षा आहेत. ...

आदर जैन कैदी बँड या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. राज कपूर यांचा नातू असल्याने त्याच्याकडून सगळ्यांच्याच अपेक्षा आहेत. आदरचे त्याच्या भावा-बहिणींसोबत म्हणजेच रणबीर कपूर, करिना कपूर यांच्यासोबत खूपच चांगले नाते आहे. तो त्यांच्या कुटुंबाविषयी सांगतो, आम्ही सगळे कामात कितीही व्यग्र असलो तरी एकमेकांना भेटण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. चेंबूरला माझी आई कृष्णा राज कपूर राहातात. त्यांच्या घरी रविवारी आम्ही जेवणाला एकत्र जमतो. आम्हाला आमच्या कामामुळे वेळ मिळाला नाही तरी माझी आई, चिंटू मामा (ऋषी कपूर), रणधीर मामा (रणधीर कपूर) ही आमच्या घरातील वडिलधारी मंडळी तरी आवर्जून चेंबूरला जातात. सध्या सगळे एकत्र आल्यानंतर तैमूरचा विषय तर पहिल्यांदा निघतो. मी माझ्या आईला त्याच्याविषयी नेहमीच विचारत असतो. आम्ही रणबीर, करिश्मा, करिना सगळे एकत्र असलो तर प्रचंड धमाल मस्ती करतो. केवळ आम्ही नाही तर आमच्या आधीची पिढीदेखील मस्ती करते. माझी आई म्हणजेच रिमा जैन आणि चिंटू मामा म्हणजेच ऋषी कपूर यांची तर नेहमीच प्रेमाची भांडणे सुरू असतात. आजही त्यांच्यात काही वेळा माझ्या आजीला मध्यस्थी करावी लागते. आज या दोघांचीही मुले मोठी झाली आहेत. पण तरीही ते दोघे एकमेकांना भेटल्यानंतर एखाद्या लहान मुलाप्रमाणेच वागतात. त्यांची भांडणं पाहून तर ते आमच्या घरातील टॉम अँड जेरी आहेत असेच आम्ही त्यांना बोलतो. आमच्या कुटुंबियांनी आज देखील मोठ्यांचा आदर करणे, वेळ काढून एकमेकांना भेटणे या गोष्टी जपल्या आहेत.