Join us  

​-आणि श्रीदेवींच्या आयुष्यात बोनी कपूर आलेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 4:18 AM

वयाची  पन्नासी ओलांडलेली अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकस्मात निधनाची बातमी सगळ्यांसाठीच धक्कादायक आहे.  १३ आॅगस्ट १९६३ साली जन्मलेल्या श्रीदेवींनी बालकलाकार ...

वयाची  पन्नासी ओलांडलेली अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकस्मात निधनाची बातमी सगळ्यांसाठीच धक्कादायक आहे.  १३ आॅगस्ट १९६३ साली जन्मलेल्या श्रीदेवींनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. ‘कंदन करुनई’ या तामिळ सिनेमात त्या बालकलाकार म्हणून झळकली होत्या. अनेक पौराणिक सिनेमांमध्येही त्यांनी काम केले.१९९६ साली श्रीदेवी दिग्दर्शक बोनी कपूरबरोबर यांच्यासोबत लग्नबंधनात अडकल्या. लग्नानंतर श्रीदेवींनी बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. पण अलीकडे ‘इंग्लिश -विंग्लिश’ आणि ‘मॉम’ या चित्रपटाद्वारे त्या पुन्हा बॉलिवूडमध्ये परतल्या होत्या.  अभिनयासाठी श्रीदेवींची चर्चा झाली, त्याचप्रमाणे त्यांच्या पर्सनल लाईफमुळेही त्या चर्चेत राहिल्या.   १६ व्या वर्षी श्रीदेवींनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. पण त्यांचा पहिला चित्रपट अपयशी ठरला. यानंतर त्यांनी जितेन्द्रसोबत ‘हिम्मतवाला’ साईन केला आणि श्रीदेवी नावाची ही अभिनेत्री रातोरात स्टार झाली. बॉलिवूडमध्ये येण्याआधी श्रीदेवी या जितेन्द्र यांच्या फॅन होत्या. यामुळे जितेन्द्रसोबत काम करायचे म्हटल्यावर श्रीदेवींचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. ‘हिम्मतवाला’ जबरदस्त हिट राहिला आणि यानंतर कोण का जाणे, दोघांच्याही रोमान्सच्या चचार्ही रंगल्या. विशेष म्हणजे, जितेन्द्र यांच्याबद्दलच्या भावना श्रीदेवी उघड उघड बोलायला लागल्या.  जितेन्द्र यांच्या घरात मात्र यामुळे जणू भूकंप आला. पत्नी शोभा व जितेन्द्र यांच्या प्रचंड तणाव निर्माण झाला. हा तणाव दूर करण्यासाठी जितेन्द्र यांनी श्रीदेवींना घरी बोलवून पत्नीशी भेट घालून दिल्याचे बोलले जाते. पण या भेटीत शोभा श्रीदेवींना नाही नाही ते बोलल्या. हा अपमान श्रीदेवी कधीच विसरू शकल्या नव्हत्या.  हीच भेट श्रीदेवी आणि जितेन्द्रच्या मतभेदाचे कारण ठरले, असेही मानले जाते. करिअर शिखरावर असताना जितेन्द्र यांच्यानंतर श्रीदेवीचे नाव सुप्रसिद्ध टेनिस खेळाडू विजय अमृतराज याच्यासोबत जुळले. अमृतराज हे टेनिससोबतच हॉलिवूडचेही मोठे नाव होते. अमृतराज श्रीदेवींवर कमालीचे भाळले होते. त्यामुळे अमृतराजचे कुटुंब श्रीदेवींच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेले. असे म्हणतात की, यानंतर या साखरपुड्याची तयारी सुरु झाली होती. पण ही तयारी सुरु असताना श्रीदेवींनी अचानक या प्रस्तावाला नकार दिला. अमृतराजनंतर ‘बॉम्बे फेम’ अरविंद स्वामी यांच्या कुटुंबीयांनीही श्रीदेवींना लग्नाची मागणी घातली होती. पण त्यावेळी श्रीदेवीचे वय खूप कमी होते.  बॉलिवूडमधील दीर्घ करिअरमध्ये श्रीदेवींचे नाव अनेकांशी जुळले. पण यात सर्वाधिक  श्रीदेवी आणि मिथुन यांच्या नात्याची प्रचंड चर्चा झाली. १९८४ मध्ये ‘जाग उठा इन्सान’च्या शूटींगदरम्यान श्रीदेवी व मिथुन यांचे प्रेम बहरल्याचे मानले जाते. मिथुन दा यांना श्रीदेवीशी लग्न करायचे होते. मात्र त्यासाठी मिथुन यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट द्यावा, अशी श्रीदेवींची अट होती. (श्रीदेवी व मिथुन यांनी सीक्रेट मॅरेज केले होते, असेही म्हटले जाते.) मिथुनने पत्नी योगिता बालीवर घटस्फोटासाठी दबाव टाकल्यावर योगिता बालीने आत्महत्येचा प्रयत्न केला. पत्नीच्या या टोकाच्या निर्णयामुळे मिथुन यांनी श्रीदेवींसोबतचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला, असे म्हटले जाते.ALSO READ : ​मुलगी खुशी आणि मनीष मल्होत्रासोबतचा श्रीदेवींचा ‘तो’ सेल्फी ठरला अखेरचा!मिथुन यांच्यासोबतचे नाते संपल्यानंतर   बोनी कपूर हे श्रीदेवीच्या आयुष्यात आले. सर्वप्रथम बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना ‘मि. इंडिया;ची आॅफर दिली. खरे तर श्रीदेवींना हा चित्रपट करायचा नव्हता. म्हणून त्यांनी या चित्रपटासाठी बोनी यांना १० लाख रुपए मानधन मागितले. त्याकाळात ही रक्कम फार मोठी होती. पण बोनी यांनी श्रीदेवींची ही मागणी मान्य केली. हा चित्रपट तयार झाला आणि सुपरहिट झाला. याचदरम्यान श्रीदेवी यांची आई आजारी पडली आणि तिला उपचारासाठी अमेरिकेला न्यावे लागले. हा संपूर्ण खर्च बोनी कपूर यांनी उचलला. बोनी कपूर यांच्या या स्वभावामुळे श्रीदेवी त्याच्या जवळ आल्या. पुढे त्यांनी लग्नाचा निर्णय  घेतला. पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन बोनी यांनी श्रीदेवीशी यांच्याशी लग्न केले.