Join us  

अनन्या पांडेने इन्स्टाग्रामवर शेअर केलं ग्लॅमरस फोटोशूट, म्हणाली- जाओ, अपने वीडियो गेम खेलो...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 5:29 PM

Ananya Panday shares her glamorous photoshoot : अनन्या पांडेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे.

अनन्या पांडे लवकरच विजय देवरेकोंडासोबत 'लायगर' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात विजय देवरकोंडा अ‍ॅक्शन अवतारात तर अनन्या पांडे ग्लॅमरस लूकमध्ये झळकणार आहे.  अनन्या पांडेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसते आहे. इतकेच नाही तर अनन्या पांडेच्या या फोटोवर चाहते आणि सेलेब्रिटीही फिदा झाले आहेत. 

 अनन्या पांडेने हे फोटोशूट शेअर करताना लिहिले, जा आपला व्हिडिओ गेम खेळा... ' बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेचा हा फोटो गौरी खानला ही आवडला आहे. इतकेच नव्हे तर त्याची बालपणीची मैत्रिण शनाया कपूरने या फोटोवर कमेंट करत लिहिले की, 'मला आतापर्यंत  सगळ्यात जास्त आवडलेले तुझा  हा फोटो...'  अनन्याचे हे फोटोशूट सध्या जोरदार व्हायरल होते आहे. 

अनन्या पांडेच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास 'स्टूडेंट ऑफ द ईयर-2′ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अनन्या प्रसिद्धीच्या झोतात आली. या चित्रपटाला 'बेस्ट डेब्यू' फिल्मफेयर अवॉर्डदेखील मिळाला होता. याशिवाय 'पति, पत्नी और वो' आणि 'खाली पीली'मध्येही ती मुख्य भूमिकेत झळकली आहे. दोन्ही सिनेमातील तिच्या भूमिका पसंत केल्या गेल्या.

टॅग्स :अनन्या पांडे