Join us  

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला पहिल्या फोटोशूटचा ‘यादगार’ फोटो, एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 4:21 PM

पाहा अमिताभ यांचे जुने फोटो....

ठळक मुद्देब्रह्मास्त्र, झुंड,  चेहरे आणि  गुलाबो-सिताबो हे त्यांचे सिनेमे येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

 लॉकडाऊनच्या काळात चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचे एक ना अनेक उपाय सेलिब्रिटी शोधून काढत आहेत. काही फिटनेसचे व्हिडीओ शेअर करत आहेत. काही लाईव्ह चॅट करत आहेत तर काही आपल्या जुन्या स्मृतींच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हेही लॉकडाऊनमुळे घरी आहेत. पण चाहत्यांशी मात्र ते सतत संपर्कात आहेत.होय, तूर्तास अमिताभ यांनी एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो काही साधा फोटो नाही तर अमिताभ यांच्या पहिल्यावहिल्या फोटोशूटचा फोटो आहे.

चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी एका मॅगझिनसाठी त्यांनी पहिल्यांदा फोटोशूट केले होते. त्याचाच हा फोटो.अमिताभ यांनी स्वत: ही माहिती दिली आहे. ‘1969 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर एका मॅगझिनसाठीचे माझे हे पहिले फोटोशूट़. स्टार अ‍ॅण्ड स्टाइल या मॅगझिनसाठी मी हे फोटोशूट केले होते. खरे तर त्यावेळी ना मी स्टार होतो, ना माझ्याकडे कोणती स्टाइल होती,’ असे त्यांनी या फोटोसोबत लिहिले आहे.या फोटोत अमिताभ हिरव्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहेत. स्टाईल सिंपल असली तरी बोलके डोळे चेह-यावरचे हास्य अनोखे आहे.

याशिवाय अमिताभ बच्चन यांनी सोशल आणखी काही फोटो शेअर केले आहेत. ज्यातील एका फोटोमध्ये ते ऋषी कपूर यांच्यासोबत दिसत आहेत. ऋषी कपूर चार्ली चॅपलिनच्या वेशात दिसत आहेत.हा फोटो  नसीब सिनेमातील ‘रंग जमके’ या गाण्याच्या शूटिंग वेळचा आहे.  एका रेस्टॉरंटमध्ये आग लागल्याचे यात दाखवण्यात आले आहे. अमिताभ बच्चन सध्या लॉकडाऊनमुळे घरी आहेत. त्यांच्या चित्रपटाचे शूटींग लांबणीवर टाकण्यात आले आहे. पण त्यांच्याकडे अनेक चित्रपट आहेत.  ब्रह्मास्त्र, झुंड,  चेहरे आणि  गुलाबो-सिताबो हे त्यांचे सिनेमे येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

पाहा अमिताभ यांचे आणखी काही जुने पण यादगार फोटो....

टॅग्स :अमिताभ बच्चन