किरणच्या बर्थडेसाठी अमिरचे खास प्लॅनिंग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2016 19:32 IST
आमिर खानने आपल्या पत्नीच्या वाढदिवसाचे खास प्लॅनिंग केले आहे. 7 नोव्हेंबरला आमिर-किरण व मुलगा आझाद याच्यासह अरुणाचल प्रदेशात बर्थडे ...
किरणच्या बर्थडेसाठी अमिरचे खास प्लॅनिंग!
आमिर खानने आपल्या पत्नीच्या वाढदिवसाचे खास प्लॅनिंग केले आहे. 7 नोव्हेंबरला आमिर-किरण व मुलगा आझाद याच्यासह अरुणाचल प्रदेशात बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे. किरणचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आमिर मागील चार-पाच दिवसांपासून पूर्वोत्तर राज्यात असल्याचे सांगण्यात येते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमिर खान व किरण राव यांनी अरुणाचल प्रदेशाकडे सोमवारीच प्रस्थान केल्याचे सांगण्यात येते. आमिरने यापूर्वी किरण राव हिचा 40 वा वाढदिवस आसाम राज्यात साजार केला होेता. किरण रावच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये आमिर व आझाद हेच सहभागी होणार आहे. आमिरचा मोठा मुलगा जुनैद व मुलगी इरा परदेशात शिक्षण घेत असल्याने ते दोघेही उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे यानंतर आमिर ‘दंगल’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होणार असल्याने तो काही आपला काही वेळ कुुटुंबासोबत घालवू इच्छितो. आमिरबद्दल असे सांगण्यात येते की तो केवळ चित्रपटांच्या बाबतीच नव्हे तर पर्सनल लाईफमध्येही ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आहे. जेथे त्याला जायचे आहे त्या जागेबद्दल तो संपूर्ण माहिती मिळवितो, प्लॅनिंग करतो, मात्र याची खबरबात कुणालाच सांगत नाही. कारण त्याला आपले गुपित व रोमॉटिकपणा शेअर करायचा नसतो. अरुणाचल प्रदेशात जाण्यासाठी विशेष अनुमतीची आवशक्ता असते. आमिरने सर्व औपचारिकता पूर्ण करूनच तो अरुणाचल प्रदेशात गेला आहे. }}}} आमिरने आपला प्लॅन दिवाळीच्या दिवशी किरणला सांगितला आणि सोमवारी त्याने अरुणाचलसाठी प्रस्थान केले. अरुणाचल प्रदेशात मोबाईल नेटवर्क नसल्याने दोघेही आपल्या दुनियेत रममान झाले असतील यात शंकाच नाही. आपल्या खास क्षणांत दोघेही कुणाचा हस्तक्षेप पसंत करीत नाही असे यावरून दिसते.