अमलाची मल्याळम सिनेमात वापसी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 17:19 IST
सी/ ओ सायरा बानो...हा कुठला पत्ता नाही. तर चित्रपट आहे. अर्थात मल्याळम चित्रपट. ‘हॅपी वेडिंग’ या चित्रपटाच्या यशानंतर इरोस ...
अमलाची मल्याळम सिनेमात वापसी!
सी/ ओ सायरा बानो...हा कुठला पत्ता नाही. तर चित्रपट आहे. अर्थात मल्याळम चित्रपट. ‘हॅपी वेडिंग’ या चित्रपटाच्या यशानंतर इरोस इंटरनॅशनल मीडिया ही कंपनी हा मल्याळम सिनेमा घेऊन येत आहे. ‘हमारी अधुरी कहानी’ या बॉलिवूडपटात दिसलेली अभिनेत्री अमला अक्कीनेनी या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. होय, गत आठवड्यात ‘सी/ ओ सायरा बानो’ या मल्याळी चित्रपटाचे शूटींग सुरु झाले. अमला यात एका वकीलाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती तब्बल दोन दशकानंतर मल्याळम चित्रपटसृष्टीत वापसी करणार आहे. अमला यापूर्वी १९९१ मध्ये आलेल्या ‘उल्लादक्कम’ या मल्याळम चित्रपटात दिसली होती.या चित्रपटात अमाला एनी जॉन थारावडी नावाच्या वकीलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. यात ती मंजू वरियरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. मंजू या चित्रपटात सायरा बानूची भूमिका साकारत आहे.अमलाने आजवर तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड व बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. १९८७ साली प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पक विमान‘ मूक चित्रपटामध्ये अमलाने कमल हासनसोबत आघाडीची भूमिका केली होती. तिला ‘उल्लादक्कम’ मल्याळी सिनेमामधील भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्या आले होते.