Join us  

‘शेवटी अशिक्षितांनी लायकी दाखवलीच...’; सलमानच्या चाहत्यांनी ट्रोल करताच अमाल मलिकची सटकली 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 5:03 PM

अमाल मलिकच्या एका वाक्याने सलमानचे फॅन्स बिथरले आणि मग त्यांनी अमालला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यानंतर अमालनेही या ट्रोल करणा-यांना सडेतोड उत्तर दिले.

ठळक मुद्देअमाल खानने २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘जय हो’ या चित्रपटाची गाणी कंपोज करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खानच्या चाहत्यांना तर तुम्ही जाणताच. भाईजानच्या विरोधात एक शब्दही ऐकून घ्यायला ते तयार नसतात. आता  गायक व संगीतकार अमाल मलिक याला भाईजानच्या चाहत्यांच्या संतापाचा सामोरे जावे लागले. अमाल मलिकने असे काय म्हटले की, भाईजानचे चाहते संतापले तर फक्त तो शाहरूख खानचा फॅन आहे, इतकेच. पण त्याच्या या एका वाक्याने सलमानचे फॅन्स बिथरले आणि मग त्यांनी अमालला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यानंतर अमालनेही या ट्रोल करणा-यांना सडेतोड उत्तर दिले.

अलीकडे एका मुलाखतीत, मी शाहरूख खानचा फॅन आहे, असे अमाल मलिकने म्हटले होते.  त्याचे हे एकच वाक्य वादाचे कारण ठरले. यानंतर सलमानच्या चाहत्यांना अमाल मलिकला सोशल मीडियावर अक्षरश: झोडपून काढले.  सलमान खानने अमाल मलिकला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक दिला होता. त्यामुळे सलमानचे चाहते अमालला ट्रोल करू लागले. अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल होताच अमालही भडकला. त्याने मग या ट्रोलर्सला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले.

‘या अशिक्षितांची लायकी काय, हे आज जगाने पाहिले. शाहरूख माझा आवडता अभिनेता आहे, केवळ या एका वाक्यामुळे या मूर्खांनी मला ट्रोल करणे सुरु केले. मला सलमान खानबद्दल आदर आहे. कारण त्याने मला लॉन्च केले आहे. पण याचा अर्थ हा नाही की, सलमानच्या चाहत्यांनी मला वाट्टेल ते बोलावे,’ अशा शब्दांत अमालने ट्रोलर्सचा क्लास घेतला.

अमालने आणखी एक ट्विट  करत आपला संताप व्यक्त केला. ‘तुम्ही कोणालाही तुमच्या आवडीनिवडीनुसार बदलायला भाग पाडू शकत नाही. तुमची आवड वेगळी, माझी वेगळी. आता हे कितीदा सांगावे लागेन माहित नाही,’ असे त्याने लिहिले.अमाल खानने २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘जय हो’ या चित्रपटाची गाणी कंपोज करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 

टॅग्स :सलमान खान