Join us  

​राखीच्या नजरेत ते सारे ‘गद्दार’!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2016 7:29 PM

आयटम गर्ल राखी सावंत वादग्रस्त विधाने करून बातम्यांत जागा मिळवितेच. आता तिला बॉलिवूडमधील काही कलाकार गद्दार वाटू लागले आहेत. ...

आयटम गर्ल राखी सावंत वादग्रस्त विधाने करून बातम्यांत जागा मिळवितेच. आता तिला बॉलिवूडमधील काही कलाकार गद्दार वाटू लागले आहेत. बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलावंताना समर्थन करणारे सर्व लोक ‘गद्दार’ आहेत असे तिने म्हटलेय. तिच्या या धक्कादायक विधानाने खळबळ माजली आहे. तिच्या या मताला कोण किती गांभिर्याने घेतो हे लकरच कळेल. ‘सर्जिकल स्ट्राईक’ मधील दोष दाखविणारे व पाक कलावंतांना बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी समर्थन करणारे काही लोक देशाशी गद्दारी करीत आहेत. त्यांनी पाकिस्तानी कलावंतांचे समर्थन करू नये. भारतातील लोकांनी त्यांना स्टार बनविले आहे. पाकिस्तानी कलावंतांची बाजू घेत त्यानी देशाशी धोका करायला नको, असा उपदेशाचा डोस तिने पाजला आहे. यावरच ती थांबली नाही. पाक कलाकारांचे समर्थन करणाºया अभिनेत्यांना उद्देशून ती म्हणाली, ‘एखादा पाकिस्तानी मुंबईतील इंड्रस्टीवर अभिनेता म्हणून हल्ला करीत असेल तर त्याची जबाबदारी स्टार घेणार काय? बॉलिवूड कलाकारांचे काम नाचणे, गाणे व कंबर हलविण्याचे आहे. या स्टार्सनी स्क्रीनवर काम करावे, नकली गोळ्या झेलाव्या. सीमेवर जे जवान खºया गोळ्यांनी शहीद होतात त्यांच्याबद्दल बोलू नये. पाकिस्तानी कलावंतांची बाजू घेऊच नये, हेच त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे ही वेळ देशासाठी एकत्र येण्याची आहे’ असेही ती म्हणाली. राखी सध्या ‘एक शाम देश के नाम’ हा शो देशभरातील विविध शहरांत सादर करीत आहे. यानिमित्ताने आयोजित एका प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना ती उत्तरे देत होती. राखीला केवळ बोलण्याची संधी हवी असते हे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र तिने यावेळी केलेले विधान अनेक बड्या कलावंतांना झोंबणारे आहे हे ही तेवढेच खरे.