Join us

आलियाला करायचाय टीव्ही डेब्यू ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 17:24 IST

आलिया भट्ट ही अभिनेत्री ‘बी टाऊन’ ची चुलबुली गर्ल म्हणून ओळखली जाते. ती नुकतीच ‘डिअर जिंदगी’ मुळे चर्चेत आली ...

आलिया भट्ट ही अभिनेत्री ‘बी टाऊन’ ची चुलबुली गर्ल म्हणून ओळखली जाते. ती नुकतीच ‘डिअर जिंदगी’ मुळे चर्चेत आली आहे. ‘उडता पंजाब’ ते ‘डिअर जिंदगी’ पर्यंत तिने चित्रपटात अनेक भूमिका साकारल्या. पण, आता ती या चित्रपटांच्या शूटिंगला जाम कंटाळली आहे. तिला ‘किपिंग अप विथ द कार्दाशियन्स’ या टीव्ही शो च्या माध्यमातून टीव्ही जगतात डेब्यू करण्याची इच्छा आहे. तिला आता या शोचे नाव ‘किपिंग अप विथ द भट्ट’ असे ठेवले जाईल असेही तिने सांगितलेय. या शोविषयी सांगताना आलिया म्हणते, ‘हा शो अत्यंत चांगला असणार आहे. कारण भट्ट कुटुंबीय हे खूप क्रेझी आहेत. जर एखाद्याची इच्छा असेल तर मी नक्कीच त्यासाठी पैसा खर्च करायला तयार आहे. ‘आलिया सध्या चित्रीकरणासोबतच काही सामजिक कार्यातही लक्ष घालताना दिसतेय. पण तिने अद्याप त्याविषयी काही सांगितले नाहीये. ती केवळ एवढेच म्हणतेय की, ‘तुम्हाला लवकरच कळेल की, मी कोणत्या प्रोजेक्टवर काम करते आहे ते.’ वरूण सोबत ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’, रणबीर कपूरसोबत ‘ड्रॅगन’ चित्रपट आलिया करतेय. तसेच ‘आशिकी ३ ’ मध्ये ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत असणारच अशी चर्चाही सुरू आहे. आलिया अशातच खूप बिझी झालेली दिसतेय. आता टीव्ही जगतात येणार म्हटल्यावर तर अजूनच जास्त बिझी होईल नाही का?