Join us  

'RRR' सिनेमाच्या शूटिंगसाठी आलिया भट हैदराबादला रवाना, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By गीतांजली | Published: December 07, 2020 12:28 PM

सिनेमाच्या शूटिंगसाठी आलिया भट्ट मुंबईहून हैदराबादला रवाना झाली आहे.

'बाहुबली' दिग्दर्शक एस.एस. राजामौली हा 'आरआरआर' हा पुढचा ब्लाकबस्टर सिनेमा आहे.प्रेक्षक या सिनेमाच्या रिलीजची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात ज्युनियर एनटीआर, राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट आणि ऑलिव्हिया मॉरिस यांच्या मुख्य भूमिका आहेत.

 रविवारी या सिनेमाच्या शूटिंगसाठी आलिया भट्ट मुंबईहून हैदराबादला रवाना झाली आहे. रविवारी ती मुंबईतला प्रायव्हेट एअरपोर्टवर दिसली. आलियाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमात अभिनेता राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. एनटीआर आणि रामचरण पहिल्यांदाच एका सिनेमात एकत्र काम करणार आहेत.‘आरआरआर’चा फर्स्ट लूक पाहिल्यानंतर हा सिनेमा ‘बाहुबली’इतकाच नाही तर त्यापेक्षाही अधिक दमदार असणार, हे स्पष्ट झालेय. व्हिडीओ पाहताना सुरुवातीलाच ‘बाहुबली’ची आठवण येते आणि अख्खा व्हिडीओ पाहिल्यानंतर या सिनेमाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचते. अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात अभिनेता राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. अजय देवगण या दोघांच्या गुरुची भूमिका साकारताना दिसणार आहे. तामिळ, तेलगू, हिंदी व मल्याळमसह एकूण १० भाषांत ‘आरआरआर’ हा सिनेमा रिलीज होईल.  

टॅग्स :आलिया भटएस.एस. राजमौलीअजय देवगण