Join us  

मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेवून आल्यानंतर आलियाची वाढली चिंता, सोशल मीडियावर पोस्टही केली शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 2:39 PM

कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या घटनांमुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांचे शूटिंग पूर्णपणे बंद आहे. अशा परिस्थितीत अनेक सेलिब्रेटी सुट्टीवर गेले होते.

देशावर कोरोनाचे संकट ओढावले असताना सेलिब्रेटी मात्र व्हॅकेशनसाठी परदेशात जाताना दिसले. अशात मालदीव्हजमध्ये जाणा-यांची संख्याही अधिक होती. रोज सेलिब्रेटींचे मालदीव्हज व्हॅकेशनचे फोटो बघून अनेकांना अशा सेलिब्रेटींवर टीका केली. जनता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणत घरात बंदिस्त झाली आणि सेलिब्रेटी मात्र मोकाट फिरत असल्याचे पाहून सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आले. अशात अनेक कलाकारांनीदेखील व्हॅकेशनवर जाणा-या सेलिब्रेटींवर संताप व्यक्त केला होता. 

नुकताच मालदीव्हज व्हॅकेशन एन्जॉय करुन आल्यानंतर आलिया भट्टने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट शेअर करत कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाबाबत चिंता व्यक्त केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये आलियाने इतरांना सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे.

 

आपल्या सर्वांसाठी फारच कठिण काळ सुरु आहे. अशावेळी गरजू लोकांपर्यंत योग्य माहिती पोहचवणं आवश्यक आहे. इथवरच आलिया थांबली नाही 'मी आनंदी आहे. फाये डिसूझासोबत त्यांच्या या  मोहिमेसोबत मी देखील जोडले गेले आहे.

 

जास्तीत-जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोण्याचा मी प्रयत्न करेल. यापलिकडे जावूनही आणखी काय करता येईल  यावर मी लक्षकेंद्रित करणार आहे. स्वतःची काळजी घ्या...' अशी पोस्ट आलियाने केली आहे.आलियाची ही पोस्ट वाचल्यानंतर मात्र नेटीझन्स पुन्हा तिच्यावर निशाणा साधला आहे. तिच्यावर संताप व्यक्त करताना दिसत आहेत. नेटीझन्सच नाहीतर आता सेलिब्रेटी देखील आलियाच्या या पोस्टवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

 

थोडी तरी लाज बाळगा, आपली जबाबदारी ओळखा; परदेशी गेलेल्या सेलिब्रिटींना नवाजुद्दीनची चपराक

देशात कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) बिघडत चाललेल्या परिस्थितीला घेऊन नवाजुद्दीन सिद्दीकी दु: खी आहे. अशा परिस्थितीत तो परदेशात सुट्टीचा आनंद घेत सोशल मीडियावर फोटो शेअर करणार्‍या अशा सेलिब्रिटींवर भडकला आहे. स्पॉटबॉयशी बोलताना तो म्हणाले, 'लोकांना अन्न नाही आणि तुम्ही पैसे फेकून एन्जॉय करत आहात. थोडी तरी लाज राखा '.तो म्हणाला- 'ते लोक काय बोलतील? या लोकांनी मालदीवला एक तमाशा बनविला आहे. मला नाही माहिती त्यांचे टूरिजम इंडस्ट्रीशी काय लागेबंध आहेत. पण माणुसकीच्या नात्याने तर कृपया आपल्या व्हॅकेशनचे फोटो आपल्याकडे ठेवा. इथं प्रत्येकजण कठीण काळाला सामोऱ्य जातो आहे. कोरोना व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, ज्या लोकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे, त्यांना हे फोटो दाखवून आणि दु:खी करु नका.

टॅग्स :आलिया भटमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस