ऋचा चढ्ढासोबतच्या नात्याविषयी अखेर अली फैजल बोलला; काय म्हटले असेल? वाचा सविस्तर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 19:47 IST
बॉलिवूडमध्ये रिलेशनशिप आणि अफेअर्सच्या बातम्या काही नव्या नाहीत. आता पुन्हा एकदा एका बॉलिवूड कपलच्या रिलेशनशिपची घोषणा करण्यात आली आहे. ...
ऋचा चढ्ढासोबतच्या नात्याविषयी अखेर अली फैजल बोलला; काय म्हटले असेल? वाचा सविस्तर !
बॉलिवूडमध्ये रिलेशनशिप आणि अफेअर्सच्या बातम्या काही नव्या नाहीत. आता पुन्हा एकदा एका बॉलिवूड कपलच्या रिलेशनशिपची घोषणा करण्यात आली आहे. होय, ‘फुकरे’ अभिनेता अली फैजल आणि ऋचा चढ्ढा यांची प्रेमकहाणी सध्या चांगलीच बहरताना दिसत आहे. विशेष म्हणजे दोघांनीही त्यांच्यातील नात्याला दुजोरा दिला असून, सध्या हे दोघे जाहीरपणे प्रेमाचा कबुलीनामा देत आहेत. एका मुलाखतीदरम्यान ऋचासोबतच्या रिलेशनशिपविषयी अलीने म्हटले की, ‘आमच्यातील फ्रेंडशिपला बराचसा काळ झाला आहे. आता आमच्यातील नाते खूपच स्पेशल झाले आहे. एचटीला दिलेल्या मुलाखतीत अली फैजलने पुढे बोलताना म्हटले की, ‘अपेक्षा करतो की, माझ्या पर्सनल लाइफविषयी मी केलेले वक्तव्य अखेरचे असेल. आम्ही खूप खूश आहोत.’ एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हे दोघेही एक ब्रॅण्ड शूटदरम्यान एकत्र आले होते. यावेळी अलीचा अथॉरेटीबरोबर थोडासा वाद झाला होता. त्यानंतर अलीला स्थानिक कारागृहातही जावे लागले होते. त्यावेळी ऋचाने त्याची बेल केली होती. काही दिवसांपूर्वीच ऋचा आणि अली वेनिस फिल्म महोत्सवात पोहोचले होते. या महोत्सवात अलीचा ‘व्हिक्टोरिया अॅण्ड अब्दुल’ या ब्रिटिश-अमेरिकन चित्रपटाचे स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते. यावेळी फैजलसोबत ऋचाही पोहोचली होती. यावेळी ऋचा आपल्या बॉयफ्रेंडचा उत्साह वाढविताना दिसून आली. ‘फुकरे’ या चित्रपटात ऋचाने एका ‘पंजाबन’ची भूमिका साकारली होती. तर अलीने भाईची भूमिका साकारली होती. आता लवकरच हे दोघे दिग्दर्शक मृगदीप सिंग लांबा यांच्या ‘फुकरे-२’मध्ये बघावयास मिळणार आहेत. नुकताच ‘फुकरे-२’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.