अक्षयच्या टॅटूमध्ये लपलेयं, या अभिनेत्रीचे नाव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 18:01 IST
सध्या अक्षयचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात अक्षय स्विमींग पूलमध्ये दिसतो आहे आणि त्याच्या खांद्यावर एक टॅटू आहे. या टॅटूमध्ये एका अभिनेत्रीचे नाव दडलेले आहे.
अक्षयच्या टॅटूमध्ये लपलेयं, या अभिनेत्रीचे नाव!
अक्षय कुमार त्याच्या कुटुंबावर अतोनात प्रेम करतो. एक प्रामाणिक पती आणि जबाबदार पिता म्हणून अक्षयकडे पाहिले जाते. अक्षयने शरिरावर गोंदवलेल्या टॅटूवरून त्याचे फॅमिलीबद्दलचे प्रेम दिसते. काही वर्षांपूर्वी अक्षयने त्याचा मोठा मुलगा आरव याच्या नावाचा टॅटू गोंदवला होता. ‘ब्लू’ या चित्रपटात अक्षय टॉपलेस दिसला होता, तेव्हा हा टॅटू दिसला होता. या चित्रपटात अक्षय आरव मल्होत्रा याच नावाने दिसला होता. सध्या अक्षयचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात अक्षय स्विमींग पूलमध्ये दिसतो आहे आणि त्याच्या खांद्यावर एक टॅटू आहे. या टॅटूमध्ये एका अभिनेत्रीचे नाव दडलेले आहे. हे नाव आहे टीना...आता भलता-सलता अर्थ काढू नका. टीना हे अक्षयची बेटर हाफ टिष्ट्वंकल हिचे नाव आहे. सो ग्रेट ना!!