Join us  

रिलीज आधीच अक्षय कुमारचा 'टॉयलेट: एक प्रेमकथा' वादात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2017 11:02 AM

अक्षय कुमारचा स्वच्छता भारत अभियानावर आधारित आगामी चित्रपट 'टॉयलेट: एक प्रेमकथा' रिलीज आधीच अडचणीत सापडला आहे. फिल्ममेकर प्रवीण व्यासने ...

अक्षय कुमारचा स्वच्छता भारत अभियानावर आधारित आगामी चित्रपट 'टॉयलेट: एक प्रेमकथा' रिलीज आधीच अडचणीत सापडला आहे. फिल्ममेकर प्रवीण व्यासने याचित्रपटाच्या टीमला लीगल नोटीस पाठवली आहे. प्रवीण व्यासने  'टॉयलेट: एक प्रेमकथा' चित्रपटावर स्क्रीप्ट चोरीचा आरोप लावला आहे. एक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार 'टॉयलेट: एक प्रेमकथा' हा चित्रपट मनिनिची कॉपी असल्याचा आरोप प्रवीण व्यासने केला आहे. गेल्या वर्षी गोव्यात झालेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये मनिनि या त्यांच्या चित्रपटाला तीसरा अॅवॉर्ड मिळाला होता. 2016मध्ये स्वच्छ भारत अभिनायवर आधारित प्रवीण व्यास यांनी मनिनि ही डॉक्युमेंट्री तयार केली होती. व्यास यांनी याच संदर्भात टॉयलेट: एक प्रेमकथा चित्रपटाच्या निर्मात्यांना लीगल नोटीस पाठवली आहे. व्यास यांच्या म्हणण्यानुसार या चित्रपटातील फक्त सीन्सच नाहीत डायलॉग्स ही सेम टू सेम घेण्यात आले आहेत. 'टॉयलेट:एक प्रेमकथा'निर्मात्यांनी पाठवलेल्या नोटीसला जर एक आठवड्याच्या आता उत्तर दिले नाहीतर आम्ही न्यायालयाचा दरवाजा वाजवू. तर दुसरीकडे चित्रपटाच्या प्रॉडक्शन आणि डीस्ट्रीब्यूशन कंपनीने या नोटीसला उत्तर देत आमच्या लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. आम्ही स्क्रीप्टसाठीचे कोणतेही पैसे देणार नाही. यासंदर्भातील लढाई आम्ही कोर्ट लढू. त्यामुळे अक्षयचा चित्रपट रिलीज आधीच अडचणीत सापडला आहे. या चित्रपटाचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा केले आहे. सध्या अक्षय त्याचा आगामी चित्रपट गोल्ड च्या शूटिंगसाठी लंडनला रवाना झाला आहे. हा चित्रपट भारतीय हॉकी संघाच्या ऑलिम्पिंकवर आधारित आहे.