Join us  

अक्षयकुमारने मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्यासोबत घेतली स्वच्छतेची शपथ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2017 10:55 AM

अभिनेता अक्षयकुमार याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत स्वच्छतेची शपथ घेतली. अक्षय त्याच्या आगामी ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ ...

अभिनेता अक्षयकुमार याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत स्वच्छतेची शपथ घेतली. अक्षय त्याच्या आगामी ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री भूमी पेडनेकर हिच्यासोबत लखनौ येथे पोहोचला होता. यावेळी अक्षय आणि भूमीने येथे साफसफाई केली. त्याचबरोबर मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्याबरोबर स्वच्छतेची शपथ घेतली. दरम्यान, योगी सरकारने उत्तर प्रदेश येथे अक्षयचा ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ हा चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. अक्षयचा हा चित्रपट ११ आॅगस्ट रोजी रिलीज होणार आहे. सध्या अक्षयसह चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यस्त असून, त्याचाच भाग म्हणून अक्षय अभिनेत्री भूमीसोबत लखनौ येथे पोहोचला होता. यावेळी चित्रपटातील ‘टॉयलेट एक जुगाड’ हे गाणे रिलीज केले. परंतु यावेळी कुठल्याही प्रकारच्या इव्हेंटचे आयोजन केले नव्हते. याव्यतिरिक्त अक्षयने लखनौमधील रायबरेल रोडवर शुक्रवारी मिलेनियम शाळेमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत अक्षय कुमारनं स्वच्छता अभियान मोहीम सुरू केले. जेव्हा या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज करण्यात आले होते, तेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अक्षयचे कौतुक केले होते. आता त्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची साथ लाभली आहे. शुक्रवारी अक्षयने मुख्यमंत्री योगी यांच्या साथीने हातात झाडू घेऊन साफसफाई करीत स्वच्छतेचा संदेश दिला. वृत्तानुसार अक्षय आणि भूमी उत्तर प्रदेश येथे एका वृत्तपत्राच्या इव्हेंटसाठी पोहोचले होते. या इव्हेंटला मुख्यमंत्री योगी यांनीही हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्री योगी आणि अक्षय यांनी शाळकरी मुलांसमवेत स्वच्छतेची शपथ घेतली. ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ हा चित्रपट स्वच्छतेवर आधारित असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाशी संबंधित आहे. दरम्यान, या चित्रपट अक्षय आणि भूमी व्यतिरिक्त दिवेंदू शर्मा, सुधीर पांडे, शोभा खोटे आणि अनुपम खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट भारतभरात टॅक्स फ्री केला जावा, अशी अक्षयने इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार उत्तर प्रदेश येथे चित्रपट टॅक्स फ्री केला आहे.