Join us  

अक्षय कुमारने पत्नीबद्दल केला मोठा खुलासा, लग्नाच्या पहिल्या रात्रीच कळली होती त्याला ट्विंकलची ही बाब

By तेजल गावडे | Published: November 03, 2020 4:00 PM

अक्षय कुमार आगामी चित्रपट 'लक्ष्मी'मुळे चर्चेत आहे.

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार आगामी चित्रपट लक्ष्मीमुळे चर्चेत आहे. त्याच्या चित्रपटाच्या शीर्षकावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. सुरूवातीला चित्रपटाचे नाव लक्ष्मी बॉम्ब होते आणि वादानंतर या चित्रपटाचे नाव लक्ष्मी ठेवण्यात आले. हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. नुकताच अक्षय कुमार आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी द कपिल शर्मा शोमध्ये गेला होता. यावेळी त्याने त्याच्या व पत्नी ट्विंकलबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.  अक्षय कुमार कपिल शर्मा शोमध्ये २५व्यांदा हजेरी लावली होती. त्याने लक्ष्मीमधील सहकलाकार कियारा आडवाणीसोबत धमालमस्ती केली. शोमध्ये अर्चना पूरन सिंगने अक्षयला काही प्रश्न विचारले. तेव्हा या प्रश्नांना न टाळता उत्तर दिले.

अर्चनाने विचारले की तू लाइफ किंग साइज जगतोस का? त्यावर अक्षय कुमारने उत्तर दिले की नाही. तो किंग साइज लाइफ जगत नाही. यावर अर्चनाने दुसरा प्रश्न विचारला की, जेव्हा भांडणं होतात तेव्हा त्यात तू जिंकतोस की ट्विंकल? या प्रश्नांचे उत्तर अक्षयने दिले की ट्विंकलच जिंकते. अक्षयने पत्नी ट्विंकलबद्दल खुलासा केला की, लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्याला समजले होते की तिच्यासोबत भांडणामध्ये तो कधीच जिंकू शकत नाही.

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची प्रेमकथा खूपच रंजक आहे. अक्षय आणि ट्विंकल यांची पहिली भेट फिल्मफेअर मासिकाच्या कव्हरपेजच्या फोटो शूटिंगसाठी झाली होती. या फोटोशूटनंतर अक्षयला ट्विंकल आवडायला लागली. त्यानंतर त्या दोघांनी इंटरनॅशनल खिलाडी या चित्रपटात काम केले. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्या दोघांचे अफेअर सुरू झाले आणि काहीच महिन्यात अक्षयने ट्विंकलला लग्नासाठी प्रपोज केले.

पण लग्न करण्याआधी ट्विंकलने त्याच्यापुढे एक अट ठेवली होती. ट्विंकलने त्याला सांगितले होते की, माझा लवकरच प्रदर्शित होणारा मेला हा चित्रपट फ्लॉप ठरला तरच मी तुझ्याशी लग्न करेन... हा चित्रपट फ्लॉप ठरला आणि त्या दोघांनी ७ जानेवारी २००१ मध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केले. अक्षय आणि ट्विंकलचे लग्न अबू जानी आणि संदीप खोसला या प्रसिद्ध डिझायरांच्या घरी ५० लोकांच्या उपस्थितीत झाले होते.

टॅग्स :अक्षय कुमारट्विंकल खन्नाअर्चना पूरण सिंगकपिल शर्मा