‘अकिरा’मुळे सोनाचा दृष्टीकोन बदलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2016 17:40 IST
सोनाक्षी सिन्हा ही अभिनेत्री कुठल्याही भूमिकेला कमी दर्जाची समजत नाही. तिला मिळालेल्या प्रत्येक चित्रपटाचे ती ‘सोने’ करते. ‘फोर्स २’ ...
‘अकिरा’मुळे सोनाचा दृष्टीकोन बदलला
सोनाक्षी सिन्हा ही अभिनेत्री कुठल्याही भूमिकेला कमी दर्जाची समजत नाही. तिला मिळालेल्या प्रत्येक चित्रपटाचे ती ‘सोने’ करते. ‘फोर्स २’ हा तिचा आगामी चित्रपट आहे. जॉन अब्राहमसोबतची तिची केमिस्ट्री यात चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. ‘अकिरा’ चित्रपटामुळे तिच्या दृष्टीकोनात झालेल्या बदलाविषयी सांगताना ती म्हणते,‘अकिराने मला माझ्या भूमिकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला भाग पाडले. मी त्यात अॅक्शन सीन्स केले. अगोदर मला वाटायचे की, मी अॅक्शन सीन्स करू शकेन की नाही. पण मी ते करू शक ले.’ सोनाक्षी सिन्हाने ‘दबंग’ चित्रपटातून सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. पहिलाच चित्रपट सलमान सोबत मिळाल्याने तिला अधिकाधिक चित्रपट मिळत गेले. आता तिने सध्याच्या सर्व ‘ए’ ग्रेड अभिनेत्यांसोबत चित्रपट केले आहेत. आता ती ‘फोर्स २’च्या निमित्ताने जॉनसोबतही दिसणार आहे.