Join us

अजयचा पहिलाच आॅनस्क्रीन किस... Unbelievable

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 17:02 IST

अजय देवगन याच्या आगामी ‘शिवाय’मध्ये किस सीनमुळे लाइमलाइटमध्ये आलेल्या एरिका कार हिच्या मते अजय देवगन याने आॅनस्क्रीन दिलेला किस ...

अजय देवगन याच्या आगामी ‘शिवाय’मध्ये किस सीनमुळे लाइमलाइटमध्ये आलेल्या एरिका कार हिच्या मते अजय देवगन याने आॅनस्क्रीन दिलेला किस सीन हा पहिलाच असेल यावर माझा अजिबात विश्वास बसत नाही. अजयच्या ‘शिवाय’मध्ये एरिकाने किस सीन दिल्याचे ट्रेलरमध्ये दिसत आहे. त्यामुळे सध्या ती यावरून चांगलीच चर्चेत आली आहे. जेव्हा तिला याविषयी विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, ‘हा सीन देताना सुरुवातीला मी नर्वस होती. मला समजत नव्हते की, हा सीन कसा असेल. मात्र सीन देताना मला अजिबात जाणवले नाही की, अजय पहिल्यांदाच आॅनस्क्रीन किस सीन देत आहे’. एरिकाच्या या वक्तव्यानंतर नक्कीच अजयच्या भुवया उंचावल्या असतील. कारण २५ वर्षांच्या करियरमध्ये एरिका ही पहिलीच अभिनेत्री आहे, जिला त्याने आॅनस्क्रिन किस केले आहे. आतापर्यंतच्या त्याच्या करियरमध्ये त्याने कधीही लिप टू लिप सीन दिलेला नाही. मात्र एरिकासोबत त्याने दिलेला हा सीन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.शिवायच्या ‘दर्खास्त’ या गाण्यात अजय आणि एरिका यांच्यात किस सीन दाखविण्यात आला आहे. अजय आणि एरिकावर शुट केलेले हे गाणे खूपच रोमॅण्टिक असून, सध्या या गाण्याने यू-ट्यूबवर धमाल उडवून दिली आहे. रोमॅण्टिक गाण्यांचा किंग अरजित सिंह आणि सुनिधी चौहान यांनी गायलेल्या या गाण्यात दोघांचीही जबरदस्त केमिस्ट्री जुळल्याचे दिसत आहे. प्रेक्षकांना हे गाणे चांगलेच भावत असल्याने एरिका भलतीच खूश आहे. मात्र तिच्या या किसच्या कॉमेंटवरून अजयची काय प्रतिक्रिया असेल हे सांगणे जरा मुश्किलच आहे.