Join us  

अर्जुन कपूर बनला अजय देवगणचा लाडका!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 4:15 PM

होय, अजय देवगण याच्यामुळे एकमोठा चित्रपट अर्जुन कपूरच्या झोळीत पडला, असे समजायला हरकत नाही. 

अर्जुन कपूर सध्या दिग्दर्शक राज कुमार गुप्तांच्या ‘इंडियाज् मोस्ट वॉन्टेड’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. या अर्जुन कपूर ‘रॉ एजंट’च्या भूमिकेत आहे. नुकताच या चित्रपटातील अर्जुनचा फर्स्ट लूक रिलीज झाला होता. आता हे सगळे सांगायचे कारण म्हणजे, अजय देवगण. होय, अजय देवगण याच्यामुळे हा मोठा चित्रपट अर्जुन कपूरच्या झोळीत पडला, असे समजायला हरकत नाही. सूत्रांचे मानाल तर या चित्रपटासाठी अजयनेच राजकुमार गुप्ता यांना या अर्जुनचे नाव सुचवले होते. ‘रेड’ या चित्रपटाचे शूटींग सुरू होते, तेव्हा राजकुमार गुप्तांनी या चित्रपटाची स्टोरी अजयला ऐकवली होती. ही स्टोरी ऐकल्यानंतर या भूमिकेसाठी अर्जुन कपूर एकदम फिट आहे, असे अजयला वाटले होते. ही गोष्ट त्याने राजकुमार गुप्ता यांनाही बोलून दाखवली होती. अजयच्या सल्ल्यानुसार गुप्ता यांनी अर्जुनला आपल्या या चित्रपटासाठी घेतले.ही बातमी केवळ इथेच संपत नाही़ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय देवगणच्या होम प्रॉडक्शनच्या चित्रपटातही अर्जुन कपूरची वर्णी लागण्याची चर्चा आहे. अजय लवकरच एका चित्रपटावर काम सुरू करतोय आणि यासाठी अर्जुन त्याची पहिली पसंत आहे. अद्याप या प्रोजेक्टवरची चर्चा प्राथमिक टप्प्यात आहे.एकंदर सांगायचे तर अजयच्या कंपूत अर्जुन कपूरची एन्ट्री झालीय. आता या कंपूत अर्जुनची किती भरभराट होते, ते तेवढे बघायचेय.  ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’बद्दलची उत्सुकता अर्जुनने अलीकडे सोशल मीडियावर बोलून दाखवली होती. ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ एक युनिक चित्रपट असणार आहे, माझा ‘इशकजादे’ रिलीज झाल्यानंतर मला पहिला कॉल करणारे राजकुमार गुप्ता होते. तेव्हापासून आम्हाला एकत्र काम करायचे होते. अखेर ही संधी मिळली. ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या चित्रपटात एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. मी हा चित्रपट करताना नव्हर्सही आहे आणि तितकाच उत्सुकही...’असे अर्जुनने सोशल मीडियावर म्हटले होते. 

टॅग्स :अर्जुन कपूरअजय देवगण