Join us  

ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा निघाली हॉलिवूडला...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 1:43 PM

ऐश्वर्या राय बच्चनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, ऐश्वर्या पुन्हा एकदा हॉलिवूड चित्रपटांसाठी सज्ज झाली आहे.

ठळक मुद्दे२०१८ मध्ये प्रदर्शित ‘फन्ने खां’ हा ऐश्वर्याचा अखेरचा बॉलिवूड सिनेमा होता. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही.

ऐश्वर्या राय बच्चनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, ऐश्वर्या पुन्हा एकदा हॉलिवूड चित्रपटांसाठी सज्ज झाली आहे. ऐश्वर्याला एका हॉलिवूड चित्रपटाची ऑफरआली आहे आणि हा हॉलिवूड प्रोजेक्ट सांभाळण्यासाठी तिने एक टीमही हायर केल्याचे कळतेय.प्रियंका चोप्रा व दीपिका पादुकोण यांच्याआधी हॉलिवूडमध्ये ऐश्वर्याचा दबदबा होता. आत्तापर्यंत तिने हॉलिवूडच्या पाच चित्रपटांत काम केले आहे. ब्राईड अ‍ॅण्ड प्रिज्युडिस, द मिस्ट्रेस ऑफ स्पाईसेज, प्रोवोक्ड, द लास्ट लीजन आणि द पिंक पँथर -2 मध्ये ऐश्वर्या झळकली आणि बघता बघता एक आंतरराष्ट्रीय चेहरा बनली. ताज्या हॉलिवूड चित्रपटाला ऐश्वर्याने होकार दिला आहे. सगळे काही जमून आले तर यावर्षा अखेरिस या हॉलिवूडपटाची घोषणा होणे अपेक्षित आहे.

२०१८ मध्ये प्रदर्शित ‘फन्ने खां’ हा ऐश्वर्याचा अखेरचा बॉलिवूड सिनेमा होता. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. त्यापूर्वी ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये ऐश्वर्या दिसली. हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला. पण याचे श्रेय ऐश्वर्याऐवजी, अनुष्का शर्मा व रणबीर कपूरच्या नावावर चढले. अशात आपले अ‍ॅक्टिंग करिअर सुरु ठेवायचे झाल्यास ऐश्वर्याला नव्या प्रोजेक्टची गरज आहे. बॉलिवूडमध्ये नवे प्रोजेक्ट मिळत नसतील तर हॉलिवूड प्रोजेक्ट स्वीकारण्यात तसेही काही गैर नाहीच. कदाचित ऐशनेही हाच विचार केला असावा.

मध्यंतरी मणिरत्नम यांच्या एका दाक्षिणात्य आगामी चित्रपटात ऐशची वर्णी लागल्याची बातमी होती. या चित्रपटात तिच्या अपोझिट  दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रम दिसणार, असेही सांगितले गेले होते. पण याबद्दलही पुढे काहीच अपडेट आले नाहीत. आता ऐशच्या हॉलिवूड प्रोजेक्टबद्दल चर्चा आहे. या चर्चेत किती तथ्य आहे, हे लवकरच कळेलच.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चन